मुंबई : भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांनी ट्विट करत राहुल गांधींना भविष्यातील लोकशाहीचा राजा असे संबोधले होते. त्यांच्या या ट्विटनंतर त्यांना टीकेचा सामना करावा लागत आहे. आता प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी देखील ट्विट करत त्यांचा समाचार घेतला आहे.
राहुल गांधी यांना पंतप्रधानपदी पाहणं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान म्हणून कायम करण्यासारखं आहे, असा जोरदार टोला जावेद अख्तर यांनी सलमान खुर्शीद यांना लगावला आहे.
Mr Salman Khurshid , your oxymoron “ king of democracy” is utterly pathetic. Rahul Gandhi can at best be acceptable as one of the Opposition leaders but any one who fantasizes RG as PM is doing his best to keep Mr Modi as prime minister of India forever.
— Javed Akhtar (@Javedakhtarjadu) May 24, 2021
जावेद अख्तर म्हणाले की, मचा विरोधाभासातील “लोकशाहीचा राजा” हा अत्यंत दयनीय आहे. राहुल गांधी यांना एक श्रेष्ठ विरोधी पक्षनेता म्हणून स्विकारता येईल पण त्यांना जे कोणी पंतप्रधान बनवण्याचं स्वप्न पाहत आहेत ते नरेंद्र मोदींना कायमस्वरुपी पंतप्रधानपदी ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.
दरम्यान, सलमान खुर्शीद यांच्या ट्विटनंतर त्यांच्यावर टीके केली जात आहे. राजीव गांधींच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांनी राहुल गांधी व राजीव गांधी यांचा फोटो शेअर केला होता. सोबतच, ‘एकेकाळचा आणि भविष्यातील लोकशाहीचा राजा’, असे म्हटले होते. यावरून त्यांच्यावर निशाणा साधला जात आहे.
Read Also :
- ‘… तर गंगेत इतके शव वाहताना पाहावे लागले नसते’, यशोमती ठाकूर यांची मोदींवर टीका
- ‘काहीजण रडकथेचाच डाव मांडून ‘रडकी बात’ वेशीवर टांगतात’
- राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गफ्फार मलिक यांचे निधन
- ‘… अन् कोरोनारुग्णांसोबत रोहित पवारांनी ‘झिगांट’वर धरला ठेका’
- ‘छत्रपती या उपाधीची केवळ निवडणुकीत वापरण्याइतपतच मोदींच्या लेखी किंमत’