मुंबई : गेल्या काही दिवसांपासून ‘कोविड टूलकिट’ प्रकरणावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. याप्रकरणी ट्विटरकडून भाजप नेत्यांच्या काही ट्विट्सवर कारवाई देखील केली. त्यानंतर आता दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेकडून ट्विटरच्या कार्यालयावर छापे टाकण्यात आल्याची माहिती आहे.
दिल्ली पोलिसांनी ‘ट्विटर इंडिया’च्या दिल्ली आणि गुरुग्राम कार्यालयात धडकले होते. यावरून आता काँग्रेस नेत्यांकडून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला जात आहे. मोदी सर्व आघाड्यांवर फेल झाल्याने हेडलाइन मॅनेजमेंटचा सहारा घ्यावा लागत असल्याची टीका आता काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केली आहे.
_ @TwitterIndia च्या कार्यालयावर छापेमारीपेक्षा केंद्र सरकारने तिच शक्ती ऑक्सिजन,औषधे व कोविड मॅनेजमेंटवर लावली असती तर गंगेच्या किनाऱ्यावर दफनविधी तसेच गंगेत इतके शव वाहताना पाहावे लागले नसते @narendramodi सर्व आघाड्यांवर फेल आहे,म्हणून दररोज हेडलाइन मॅनेजमेंटचा सहारा घेत आहे
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) May 24, 2021
यशोमती ठाकूर म्हणाल्या की, ट्विटर इंडियाच्या कार्यालयावर छापेमारीपेक्षा केंद्र सरकारने तिच शक्ती ऑक्सिजन, औषधे व कोविड मॅनेजमेंटवर लावली असती तर गंगेच्या किनाऱ्यावर दफनविधी तसेच गंगेत इतके शव वाहताना पाहावे लागले नसते. नरेंद्र मोदी सर्व आघाड्यांवर फेल आहे, म्हणून दररोज हेडलाइन मॅनेजमेंटचा सहारा घेत आहे, अशी जोरदार टीका त्यांनी पंतप्रधानांवर केली.
दरम्यान, दिल्ली पोलिसांनी नवी दिल्लीमधली लाडो सराय भागातल्या आणि गुडगावमधल्या ट्विटरच्या कार्यालयांवर हे छापे मारले होते. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने ‘टूलकिट मॅन्युपिलेशन मीडिया’ प्रकरणी तपास करण्यासाठी ट्विटर इंडियाला नोटीसही पाठवली होती. पोलिसांनी छापेमारीसंदर्भात मात्र नकार दिला आहे. नियमित प्रक्रियेचा भाग म्हणून नोटीस बजावण्यासाठी दिल्ली पोलिसांचे पथक ट्विटरच्या कार्यालयांत गेले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Read Also :
- ‘काहीजण रडकथेचाच डाव मांडून ‘रडकी बात’ वेशीवर टांगतात’
- राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गफ्फार मलिक यांचे निधन
- ‘… अन् कोरोनारुग्णांसोबत रोहित पवारांनी ‘झिगांट’वर धरला ठेका’
- ‘छत्रपती या उपाधीची केवळ निवडणुकीत वापरण्याइतपतच मोदींच्या लेखी किंमत’
- ‘… म्हणून पंतप्रधान मोदींची आजपर्यंत संभाजीराजेंशी भेट होऊ शकली नाही’