मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गफ्फार मलिक यांचे निधन झाले आहे. गफ्फार मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील महत्त्वाचा मुस्लिम चेहरा मानले जात असे. तसेच ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्यांक आघाडीचे माजी प्रदेशाध्यक्ष देखील होते.
गफ्फार मलिक यांनी जळगाव नगरपालिका आणि नंतर जळगाव महापालिकेत नगरसेवकपदासह विविध समितींचे अध्यक्षस्थान भूषविले होते. त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यानच, हृदयविकारच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला.
Saddened to learn about the demise of @NCPspeaks State Minority President Abdul Gaffar Malik Ji.
May Allah grant him the highest rank in Jannah. Condolences and strength with the family and close ones in this hour of grief. pic.twitter.com/FlUwyZOP0u— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) May 24, 2021
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला. तसेच, या दुःखात त्यांच्या कुटुंबियासोबत असल्याचे ते म्हणाले.
गफ्फार मलिक ह्यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी आहे राष्ट्रवादी काँग्रेस ने एक निष्ठावान नेता गमावला पक्षासाठी तळमळीने काम करणाऱ्या ह्या नेत्याच्या जाण्याने पक्षाची हानी झाली आहे
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 24, 2021
गफ्फार मलिक ह्यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी आहे राष्ट्रवादी काँग्रेस ने एक निष्ठावान नेता गमावला पक्षासाठी तळमळीने काम करणाऱ्या ह्या नेत्याच्या जाण्याने पक्षाची हानी झाली आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील मुस्लीम चेहरा म्हणून ओळखले जाणारे गफ्फार मलिक यांनी २०१४ मध्ये यावल-रावेर विधानसभा मतदारसंघातून निवडणून लढविली होती. मात्र, ते पराभूत झाले होते.
Read Also :