मुंबई : छत्रपती संभाजीराजे यांच्या नावातील छत्रपती या उपाधीची केवळ निवडणुकीत वापरण्याइतपतच मोदींच्या लेखी किंमत आहे, अशा शब्दात काँग्रेसने मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
मराठा आरक्षणाप्रश्नी खासदार संभाजीराजे सातत्याने पंतप्रधान मोदींची भेट घेण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र अद्याप ही भेट होऊ शकलेली नाही. याबाबत बोलताना मराठा आरक्षण हा राज्याचा विषय आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटते. त्यामुळेच पंतप्रधान मोदी यांची आजपर्यंत संभाजीराजे छत्रपतींशी भेट होऊ शकली नसल्याचे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. यावरून आता काँग्रेसने भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
मनकवड्या चंद्रकांत पाटील यांनी तीन गोष्टी स्पष्ट केल्या आहेत
१ मोदींची विषयांची समज फार कमी आहे.
२. मोदींना मराठा आरक्षण हा विषय समजलाच नाही.
३. छत्रपती संभाजीराजे यांच्या नावातील छत्रपती या उपाधीची केवळ निवडणुकीत वापरण्याइतपतच मोदींच्या लेखी किंमत आहे. https://t.co/adZNnj0q9J— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) May 24, 2021
मनकवड्या चंद्रकांत पाटील यांनी तीन गोष्टी स्पष्ट केल्या आहेत – 1. मोदींची विषयांची समज फार कमी आहे. 2. मोदींना मराठा आरक्षण हा विषय समजलाच नाही. 3. छत्रपती संभाजीराजे यांच्या नावातील छत्रपती या उपाधीची केवळ निवडणुकीत वापरण्या इतपतच मोदींच्या लेखी किंमत आहे, असे ट्विट करत काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.
दरम्यान, संभाजीराजे यांनी तीनदा भेटीची वेळ मागून देखील अद्याप पंतप्रधान मोदींची त्यांच्याशी भेट झालेली नाही. याबाबत प्रश्न विचारला असता मराठा आरक्षण हा राज्याचा सूचीमधील विषय आहे. त्यासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट मागितली असेल. पण त्यात केंद्राची काहीच भूमिका नाही. म्हणूनच भेटून उपयोग होणार नाही, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते.
Read Also :