अहमदनगर : राज्यातील कोरोनारुग्णांची संख्या गेल्या काही दिवसात कमी होताना दिसत आहे. रुग्णांच्या उपचासाठी अनेक ठिकाणी कोविड सेंटर्स उभारण्यात आले आहे. या आजाराच्या काळात रुग्णांना मानसिक आधार मिळावा यासाठी अनेक लहान-मोठे कार्यक्रम देखील या सेंटर्समध्ये झाल्याचे पाहायला मिळाले आहे. अशाच एका कोविड सेंटर्समध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार रुग्णांसोबत डान्स करताना पाहायला मिळाले.
रोहित पवारांनी कर्जतमधील गायकवाडी येथील कोविड सेंटरला भेट दिली. यावेळी रुग्णांना आनंदी वातावरण देणे, गंभीर वातावरण हलकंफुलकं करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रोहित पवार देखील अबालवृद्धांसोबत सहभागी झाले. त्यांनी देखील रुग्णांसोबत रुग्णांसोबत झिंगाट गाण्यावर ठेका धरला.
गायकरवाडी (कर्जत) येथील कोविड सेंटरमध्ये रुग्णांमध्ये असलेलं गंभीर वातावरण हलकंफुलकं करण्यासाठी गायक तुषार घोडके यांचा गाण्याचा कार्यक्रम ठेवला होता. यावेळी त्यांच्या 'झिंगाट' गाण्यावर तिथल्या आजींनीही ठेका धरला आणि आणि नकळत मीही त्यांच्यात सहभागी झालो. pic.twitter.com/EuniVa8FU6
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 24, 2021
रोहित पवारांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘गायकरवाडी (कर्जत) येथील कोविड सेंटरमध्ये रुग्णांमध्ये असलेलं गंभीर वातावरण हलकंफुलकं करण्यासाठी गायक तुषार घोडके यांचा गाण्याचा कार्यक्रम ठेवला होता. यावेळी त्यांच्या ‘झिंगाट’ गाण्यावर तिथल्या आजींनीही ठेका धरला आणि आणि नकळत मीही त्यांच्यात सहभागी झालो’, असे लिहित रोहित पवारांनी ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला.
दरम्यान, रोहित पवार सातत्याने कोविड सेंटर्स, हॉस्पिटल्सला भेट देत रुग्णांची विचारपूस करत आहे. काल त्यांनी बारामतीमधील काही हॉस्पिटल्सला भेट देत डॉक्टर आणि नर्सशी चर्चा केली.
Read Also :