मुंबई : कोरोना व्हायरस महामारीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान सातत्याने डॉक्टर, तंज्ञांशी संवाद साधत आहे. अशाच एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले होते. मोदी अशाप्रकारे सार्वजनिकरित्या भावूक झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांना ट्रोल देखील केले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी हा ठरवून झालेला कार्यक्रम असल्याचे म्हटले होते.
आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून पंतप्रधान मोदींचा एक व्हिडीओ शेअर करत त्यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. या व्हिडीओत पंतप्रधानांना वेगवेगळ्या कार्यक्रमात अश्रू अनावर आल्याचे दिसत आहे. त्याचाच व्हिडीओ राष्ट्रवादीने शेअर केला आहे.
रडणं ही विफलतेची भावना.
काही इतके हळवे
की डोळ्यांतून गंगा 'नमुना' सुरू करतात. काही अभि'नेते'ही हुकमी रडू शकतात.
आपल्या संस्कृतीत तर रुदाली म्हणजे 'मोले घातले हो रडायाला' असाही प्रकार आहे.
रडीचा डाव हा जगासाठी कावा-कांगावा.
पण काहीजण
रडकथेचाच डाव मांडून
'रडकी बात'
वेशीवर टांगतात. pic.twitter.com/r1rsr5KCEI— NCP (@NCPspeaks) May 24, 2021
रडणं ही विफलतेची भावना. काही इतके हळवे की डोळ्यांतून गंगा ‘नमुना’ सुरू करतात. काही अभि’नेते’ही हुकमी रडू शकतात. आपल्या संस्कृतीत तर रुदाली म्हणजे ‘मोले घातले हो रडायाला’ असाही प्रकार आहे. रडीचा डाव हा जगासाठी कावा-कांगावा. पण काहीजण रडकथेचाच डाव मांडून ‘रडकी बात’ वेशीवर टांगतात, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसकडून पंतप्रधान मोदींना लगावण्यात आला आहे.
दरम्यान, नवाब मलिक यांनी देखील यावरून मोदींवर निशाणा साधला होता. ‘याच कार्यक्रमात मोदींनी मास्क का घातला नाही व परचा का घालून आले नाहीत. ते खरंच भावुक झाले की ठरवून झाले यावर जनता प्रश्न करत आहे,’, असे मलिक म्हणाले होते.
Read Also :