मुंबई : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांच्या हस्ते, टाटा कॅन्सर हॉस्पिटलमधील रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी म्हाडाच्या १०० खोल्यांचा ताबा टाटा रुग्णालयाकडे दिला होता. मात्र, शिवसेनेचे शिवडीचे आमदार अजय चौधरी यांनी याबद्दलची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केल्यानंतर, गृहनिर्माण विभागाच्या या निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली असून, या निर्णयावर आव्हाडांनी नाराजी व्यक्त केली आहे.
हे पण वाचा, “आव्हाडांनी माझी दखल घेतली नाही, त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जावं लागलं”
“मला आनंद आहे की मुख्यमंत्री आपल्या आमदारांचा किती सन्मान करतात, आपल्या मंत्रिमंडळाच्याच मंत्र्याने, आपली परवानगी घेऊन घेतलेल्या निर्णयाला, जर आपल्या पक्षाचा आमदार विरोध करत आहे, तर त्याची मर्जी पहिल्यांदा राखली पाहिजे, हा मुख्यमंत्र्यांचा दृष्टीकोन, एक नेता म्हणून मला वाखण्याजोग्या वाटतो,” असं खोचक वक्तव्य त्यानी केलं आहे.
हे पण वाचा, ओबीसी समाजावरील अन्याय थांबवून निवडणूका रद्द करा, अन्यथा….; फडणवीस आक्रमक
तसेच, “ही घर काही माझ्या बापाची नाहीत. ही घरं गरिबांना मिळ्णार आहेत. तसेच, याबाबतीत एकाही स्थानिकाला डावललं गेलेलं नाहीये. टीव्हीवर जे सांगितलं जातंय, कि कोणाची तरी घरं काढून घेतली जात आहेत, तर माझ्या मेलेल्या आईची शपथ घेऊन मी सांगतो, की मी त्यातला माणूस नाही, माझी आई २७ दिवसांत कॅन्सरने गेली, त्यामुळे असले धंदे मी करणार नाही. मुख्यमंत्र्यांनीच कॅन्सरग्रस्तांच्या म्हाडा सदनिकांना परवानगी दिली होती,” असं सांगत त्यांनी, “मी कोणतीही गोष्ट पूर्वपरवानगी शिवाय करत नाही,” असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.
हे पण वाचा, शिवसेनेने बांधले घड्याळ, राष्ट्रवादीने उचलला बाण, नव्या युतीचा मुहूर्त ठरला
यावेळी, “परळमधल्या १०० सदनिका, या कॅन्सर पीडितांच्या नातेवाईकांना सध्या तात्पुरत्या स्वरुपात दिल्या जाणार असून, तिथे कॅन्सर रुग्ण अजिबात राहणार नाहीयेत. हा अजय चौधरी यांचा गैरसमज असून, तो दूर केला जाईल पण, कॅन्सर आजार हवेतून पसरत आजार नाही,” असा टोलादेखील त्यांनी आमदार अजय चौधरींना लगावला आहे. तसेच, “मी कुठल्याच आमदाराला भेट नाकारत नाही,” असं खुलासा त्यांनी यावेळी केला आहे.
Read Also :
- मोदींची ही अशी बनवाबनवी; सर्वाधिक लसीकरणाच्या विक्रमामागे ‘हे’ खळबळजनक रहस्य
- “अजित पवार आणि माझी भेट झाली होती मात्र…” राम शिंदे यांनी शब्द फिरवले
- जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पोटनिवडणूकांविरोधात न्यायालयात जाणार – पंकजा मुंडे
- आघाडी सरकरमधल्या आणखी एका पक्षाने केली स्वबळावर लढण्याची भूमिका जाहीर
- प्रशांत किशोर-शरद पवारांच्या भेटीचे कोडे उलगडेना! १५ दिवसांतील तिसरी भेट