बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच दोन्ही पवारांचं भविष्य मतदारांनी मतपेटीत टाकलं आहे. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार तर महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे यांच्यात कोण बाजी मारणार ते आता येत्या ०४ जुनला समजणार आहे. यातच ०७ मे ला बारामती लोकसभा मतदारसंघात ५६.०७ टक्के मतदान झालं आहे. त्यामुळे याठिकाणाहून आता कोण विजयी होणार याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिलीय.
बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये ‘काटे की टक्कर’ असल्याचं चित्र आहे. बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर आणि भोरमध्ये ‘सामना’ बरोबरीनं सुटला अथवा काही प्रमाणात सुप्रिया सुळेंना आघाडी मिळाली, तर ते लीड तोडण्याची आणि महायुतीला विजयी आघाडी देण्याची ताकद एकट्या खडकवासला विधानसभा मतदारसंघांमध्ये आहे.
हेही वाचा…“जो सध्या बोलबच्चन करतोय, त्याला मीच शोधून आणलं होतं”, अजित पवारांचा कोल्हेंवर निशाणा
2014-19 या निवडणुकांचे निकाल पाहता सुप्रिया सुळेंना अन्य मतदारसंघातून मिळालेली आघाडी कमी करण्याचं हे खडकवासला मतदारसंघानं केलेलं आहे. खडकवासला मतदारसंघातून कांचन कुल यांना 70 हजार हजारांहून अधिक मतांची आघाडी घेतली होती. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना 85 हजार 993 मते, तर कुल यांना 1 लाख 52 हजार 487 अशी विक्रमी मते मिळाली होती.
2014 च्या निवडणुकीत भाजपचा पाठिंबा असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी सुळे यांच्यापेक्षा 20 हजारांहून अधिक मतांची आघाडी खडकवासला मतदारसंघातून घेतली होती. या निवडणुकीत सुळे यांना 70 हजार 602 मते, तर जानकर यांना 98 हजार 729 मते मिळाली होती. त्यानिवडणुकीत जानकर भाजपाच्या कमळ चिन्हावरती निवडणूक लढले नाही. अन्यथा वेगळं चित्र असतं, असं काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी म्हटलं होतं.
हेही वाचा…“बारणेंना निवडून दिलं नसतं तर मी केंद्रात मंत्रीच झालो नसतो”,गडकरींचं मोठं विधान
यंदाच्या निवडणुकीत खडकवासला मतदारसंघात 50 टक्के मतदान झालं आहे. 2019 मध्ये 53 टक्के मतदान झालं होतं. खडकवासला मतदारसंघात पाच लाख 38 हजार मतदार आहेत. या मतदारसंघांमध्ये 50 टक्के मतदान झाल्याचे गृहीत धरल्यास दोन लाख 70 हजार मतदारांनी आपला मतदानाचा अधिकार बजावल्याचं स्पष्ट होत आहे. ही टक्केवारी मागच्या वेळेप्रमाणेच आहे, असं बोललं तरी हरकत नाही. त्यामुळे मागच्यावेळी प्रमाणेच महायुतीला या ठिकाणी बहुमत मिळाल्यास ही निर्णय आघाडी महायुतीसाठी होऊ शकते.
दुसरीकडे सलग दोन निवडणुकांमध्ये खडकवासला मतदारसंघांमध्ये पिछाडीवरती राहिल्यामुळे सुप्रिया सुळे यांनी गेल्या दोन वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात खडकवासला भागातील सोसायटी यांना भेट देत पेरणी केली आहे. त्यामुळे त्यांची ही पेरणी कितपत कामाला येते यावरती बारामती लोकसभा मतदारसंघातील खासदार कोण होणार? हे ठरणार असल्याचं बोललं जात आहे.
READ ALSO :
हेही वाचा..श्रीराम मंदिर निर्माण कार्यासाठी घेतला पुढाकार ; म्हणून महायुतीला देऊया साथ..!
हेही वाचा…“भावजयीचा पराभव करण्यासाठी नणंद मैदानात”, सासरा सुनबाईंच्या प्रचारात
हेही वाचा…“मागील १५ वर्षांत मी काम केलं, अन् त्यांनी ५ वर्षात फक्त कामाचा अभिनय केला”