नगर : भाजप-काँग्रेसने, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका स्वबळावर लढण्याची घोषणा केली असून, त्यामुळे शिवसेना -राष्ट्रवादी एकत्र लढणार का? अशी नवीन युती येणाऱ्या काळात राज्याच्या राजकीय मैदानात पाहायला मिळणार का? असे अनेक प्रश्न राजकीय चाणक्यांना आणि जनतेला पडले आहेत. यातच राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून, यावर अशी काही विधाने केली जात आहेत, की ही युती होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
हे पण वाचा, काँग्रेस स्वबळावरच लढणार, आम्ही शब्द दिलाय, आता माघार नाही – नाना पटोले
या पार्श्वभूमीवर,नगरमध्ये याची पहिली झलक पाहायला मिळण्याची शक्यता असून, अहमदनगर महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपची सत्ता उलथवून लावण्यासाठी, शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मिळत आहे.
हे पण वाचा, मुख्यमंत्र्याचा विदेशात काळा पैसा; त्यांच्याच आशिर्वादाने मला अडकवण्याचा डाव, राणा दाम्पत्याने केले आरोप
याबाबत, थेट मुंबई दरबारी निर्णय झाला असून, या अनुषंगाने नुकतीच मुंबईत बैठक पार पडली. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत, नगरमध्ये भाजपला शह देण्यासाठी, दोन्ही पक्षांनी युती करणे गरजेच आहे, असं एकमत झालं असून, महापौरपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र निवडणूक लढवण्यावर शिक्कामोर्तब झालं असल्याची माहिती, शिवसेनेचे नगर जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांनी दिली आहे. तसेच, दैनिक सामनामध्ये देखील याबाबतचे वृत्त आले आहे.
हे पण वाचा, ओबीसी नेत्यांच्या घोषणा ठरल्या फोल; आता वडेट्टीवार, बावनकुळे काय करणार?
महापालिकेतील विद्यमान महापौरांचा कार्यकाळ हा, येत्या ३० जून रोजी संपणार आहे. त्यामुळे यांनतर त्यादिवशी सकाळी, महापौर निवडणुकीसाठी ११ वाजता, महापौर निवडणुकीची सभा होणार आहे. दरम्यान, महापौरपद हे ‘अनुसूचित जाती महिला’ प्रवर्गाकरिता राखीव आहे. त्यामुळे आता महापौरपदी कोण विराजमान होणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
महापालिकेतील एकूण पक्षीय बलाबल (एकूण जागा ६७)
शिवसेना- २३, राष्ट्रवादी -१९, भाजप १५, काँग्रेस- ५, बसपा -४, अपक्ष -१
Read Also :
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुकांची घोषणा हा तर ओबीसींवर घोर अन्याय; पंकजा मुंडे म्हणतात…
- राष्ट्रवादीसह शरद पवारांनाही धक्का; टाटा रुग्णालयाला ‘म्हाडा’च्या सदनिका देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांकडून स्थगित!
- आरटीओ कथित भ्रष्टाचार प्रकरण: परिवहन मंत्री अनिल परबांना पोलिसांकडून क्लिन चीट
- अर्णब गोस्वामींवर कथित TRP घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांकडून आरोपपत्र दाखल
- शिवसेनेत अंतर्गत धुसफूस; भाजपच्या पाठीत खंजीर खुपसल्यामुळेच, भाजप नेत्याचा दावा