पुणे : पुण्यातील आंबील ओढ्यालगत असलेल्या घरांवर काल पुणे महापालिकेने कोणताही विचार न करता, सहानभूती न दाखवता बुलडोझर चालवला. महापालिकेच्या असंवेदनशील कृतीवर बोलताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे चांगल्याच भडकल्या. झेपत नसेल तर पुण्याच्या महापौरांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. त्यावर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सुप्रिया सुळे यांना सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. मला सल्ला देण्याऐवजी स्वत: आत्मपरीक्षण करावं, असं मोहोळ म्हणाले.
हे पण वाचा, आंबिल ओढा कारवाईशी पुणे पालिकेचा संबंध नाही; महापौर मुरलीधर मोहोळांनी हात झटकले
आंबिल ओढ्यालगतच्या घरांवर कोणाच्या दबावाखाली कारवाई करण्यात आली हे सर्वांना माहिती आहे. सुप्रिया सुळे यांचं पुण्यात येणं कमी झालेलं आहे. तेव्हा सुप्रिया सुळे यांनी माहिती घेऊन बोललं तर बरं होईल, असं महापौर मोहोळ म्हणाले.
हे पण वाचा, पुण्यातील आंबिल ओढ्याचा वाद पेटला; नागरिकांचा रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न
झेपत नसेल तर पुण्याच्या महापौरांनी राजीनामा द्यावा, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर निशाणा साधला होता. त्यांच्या टीकेला महापौर मोहोळ यांनी तडेतोड प्रत्युत्तर दिलंय. मला झेपत नसेल तर राजीनामा देण्याचा सल्ला देण्याऐवजी स्वतः आत्मपरीक्षण करावं, असं उत्तर मुरलीधर मोहोळ यांनी सुप्रिया सुळेंना दिलं.
काय आहे प्रकरण?
पुण्यातील आंबिल ओढा परिसरात अतिक्रमण हटवण्याची कारवाई कऱण्यात आली. या कारवाईदरम्यान स्थानिक आणि पोलिस प्रशासन आमने-सामने आले होते. या कारवाईला स्थानिकांनी विरोध केला. तसेच यावेळी आंदोलनादरम्यान आत्मदहनाचा प्रयत्न झाला. यावेळी स्थानिकांनी आक्रमक पवित्रा घेत मोठी गर्दी केली होती.
हे पण वाचा, आंबिल ओढा कारवाईला सत्ताधारी भाजपच जबाबदार; खासदार वंदना चव्हाण संतापल्या
बिल्डरच्या फायद्यासाठी आंबिल ओढ्याचा नैसर्गिक प्रवास बदलण्याचा घाट घालण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप आहे. त्यासाठी जबरदस्तीने आंबिल ओढ्यात असलेली घरे पाडण्याच्या कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, पोलिस आणि स्थानिकांमध्ये झटापटही पाहायला मिळाली. या कारवाईला आंबिल ओढ्यातील नागरिकांचा विरोध पाहायला मिळाला. यावेळी काहींनी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यानच्या काळात आंबिल ओढ्यात ७०० ते ८०० पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
Read Also :
- ईडीच्या कारवाईनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची नागपुरात जोरदार निदर्शने, धरपकड सुरु
- ओबीसी आरक्षण रद्द होण्याला जबाबदार असणाऱ्या मोदी सरकार विरोधात २६ जूनला काँग्रेसचे राज्यव्यापी आंदोलन
- “जनतेवर अन्याय करून, कोणताही विकास करता येणार नाही”- प्रविण दरेकर
- “मुख्यमंत्र्यांसोबत अनिल परब, मिलिंद नार्वेकर, रवींद्र वायकर यांनी बांधलेल्या अनधिकृत बंगल्यांची सीबीआय चौकशी व्हावी”
- सीबीआय, ED काय भाजपाची कार्यकर्ती आहे का? – संजय राऊत