अमरावती : विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी, अमरावती चे अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारीणी सदस्य प्रा. डॉ. नितीन धांडे, भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार यांनी अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाचा उमेदवारी अर्ज आज विभागीय आयुक्त श्री पियुष सिहं यांच्या कडे दाखल केला.
नामांकन अर्ज दाखल करतांना आ. रणजीतजी पाटील, आ. प्रविणजी पोटे, आमदार रणधीरजी सावरकर, आ. प्रतापजी अडसड, भारतीय जनता पार्टी अमरावती जिल्हा शहर अध्यक्ष मा. किरणभाऊ पातुरकर, भारतीय जनता पार्टी अमरावती जिल्हा ग्रामिण अध्यक्ष मा. निवेदीताताई चौधरी, विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी अमरावतीचे सचिव श्री. युवराजसिंग चौधरी व शिक्षक हे सर्व समर्थनार्थ सोबत उपस्थित होते. या निमित्याने भारतीय जनता पार्टी पश्चिम विदर्भातील प्रमुख पदाधिकारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बैठकीला भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र पदेशाचे सरचिटणीस मा. चंद्रशेखरजी बावणकुळे, भारतीय जनता पार्टी अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाचे निवडणुक प्रभारी मा. श्री. चैनसुखजी संचेती , भारतीय जनता पार्टी विदर्भ प्रांताचे संघटन मंत्री मा. डॉ. उपेंद्रजी कोठेकर मा. आ. अशोक ऊईके (अनुसुचित जमाती आघाडीचे प्रदेशाध्यक्ष), माजी मंत्री मा. डॉ. अनिलजी बोंडे (अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चा), मा. आ. गोवर्धनजी शर्मा, माजी मंत्री मा. आ. रणजीतजी पाटील, मा. आ. प्रविणजी पोटे, अमरावतीचे महापौर मा. श्री. चेतनजी गावंडे, अकोल्याचे महापौर मा. श्री. विजयजी अग्रवाल, मा. आ. रणधीरजी सावरकर, मा. आ. ससाणे, भारतीय जनता पार्टी प्रदेश प्रवक्ता मा. श्री. शिवरायजी कुळकर्णी, भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडी पश्चिम विदर्भ संयोजक मा. डॉ. नितीन खर्चे, माजी आमदार मा. श्री. प्रभुदासजी भिलावेकर, माजी आमदार मा. श्री. रमेश बुंदिले, माजी आमदार मा. श्री. नारायणराव गव्हाणकर, भारतीय जनता पार्टी सर्व जिल्हाध्यक्ष हे उपस्थित होते.
Read Also :
भाजपच्या ‘या’ नेत्याने धरला काँग्रेसचा ‘हात’ भाजपला पडले मोठे खिंडार
मुख्यमंत्रीपद मिळाल्यास नितीश कुमारांनी त्याचं श्रेय शिवसेनेला द्यावं : संजय राऊत
काय बोलताय? अमेरिकेचे नवे अध्यक्ष जो बायडन यांची ‘नात’ नागपूरकर?
फक्त ‘या’ कारणामुळे आम्ही मुख्यमंत्री नितीश कुमारांना झटका दिला: चिराग पासवान