मुंबई : भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे नाराज असून पक्षातील नेत्यांवर तसंच देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत. एकनाथ खडसे यांनी अनेकदा जाहीरपणे आपल्याला इतर पक्षांकडून ऑफर असल्याचंही सांगितलं आहे. त्यातच आता एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. एकनाथ खडसे किंवा राष्ट्रवादीकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे अशी कोणती भूमिका घेणार नाहीत असा विश्वास व्यक्त केला आहे. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितलं की, “एकनाथ खडसे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. पक्षांना आजवर त्यांना भरभरुन दिलं आहे. त्यामुळे पक्षाचं नुकसान होईल अशी कोणती भूमिका ते घेणार नाहीत. याआधीही त्यांच्याबद्दल अशा चर्चा झाल्या असून त्या अफवा ठरल्या आहेत. हीदेखील अफवाच ठरेल”.
गेल्या काही दिवसांमध्ये भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात नाराजी व्यक्त करत इतर पक्षाचा विचार करू असे म्हंटले होते.त्याच अनुषंगाने राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील जळगावच्या दौऱ्यावर येणार होते मात्र त्यांचा दौरा रद्द झाला आहे. त्या ऐवजी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हेच मुंबईत बैठक घेणार आहेत.
Read Also
कलियुगातील हरिश्चंद्र… अतुल भातखळकर यांचा शरद पवार यांच्यावर निशाणाhttps://t.co/U1JFLenBlV#Atulbhatkhalkar #SharadPawar #BJP #NCP@BhatkhalkarA @PawarSpeaks
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 23, 2020