भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा आघाडी सरकारला धारेवर धरले आहे. महाविकास आघाडी सरकारमधील घटकांना झोपेच्या गोळ्या घेण्याची गरज आहे, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे.
“महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांना झोपेच्या गोळ्या घेण्याची गरज आहे. सरकार आता पडेल की नंतर या भीतीने त्यांना झोप येत नसेल. पण तुम्ही सरकार चालवा, आम्ही ते पाडण्यासाठी प्रयत्न करणार नाही” अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
दूध दरवाढीसाठी भाजपने 1 ऑगस्टला आंदोलनासाठी तयारी सुरु केली आहे. डेअरीना प्रतिलिटर दहा रुपये देण्याची भाजपची मागणी आहे. रासप, रयत क्रांती, रिपाइं या संघटनाही आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.