मुंबई : माजी मंत्री आणि शिवसेनेचे गुहागर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी पोटापाण्यासाठी दारू विकली तर काय झालं? पोलीस देखील हफ्त घेत नाहीत का? असे धक्कादायक विधान केल्यानंतर आता भाजपकडून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. सत्तेसाठी हिंदुत्व विकले मग कार्यकर्त्यांनी दारू विकली तर बिघडले कुठे ? असा टोला भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनाला लगावला आहे.
पोलिसांनी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख बाबू सावंत यांच्यावर अवैध दारुविक्री केल्याने कारवाई केली होती. त्यांची पाठराखण करताना गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना लोकांनी पोटापाण्यासाठी दारु विकली तर काय बिघडलं?, असे वक्तव्य भास्कर जाधव यांनी केले होते.
पोटापाण्यासाठी दारू विकली तर काय झालं? कार्यकर्त्याच्या समर्थनार्थ माजी मंत्री, सेना आमदार भास्कर जाधवांचं धक्कादायक विधान…
हो बरोबर आहे नेत्यांनी सत्तेसाठी लाज विकली, हिंदुत्व विकले आणि इटालियन काँग्रेसच्या मांडीवर बसले मग कार्यकर्त्यांनी दारू विकली तर बिघडले कुठे ? pic.twitter.com/tD0mZ2UDTS— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) November 17, 2020
भास्कर जाधव यांच्या या वक्तव्यानंतर भातखळकर यांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. भातखळकर यांनी ट्विट केले की, पोटापाण्यासाठी दारू विकली तर काय झालं? कार्यकर्त्याच्या समर्थनार्थ माजी मंत्री, सेना आमदार भास्कर जाधवांचं धक्कादायक विधान…हो बरोबर आहे. नेत्यांनी सत्तेसाठी लाज विकली, हिंदुत्व विकले आणि इटालियन काँग्रेसच्या मांडीवर बसले मग कार्यकर्त्यांनी दारू विकली तर बिघडले कुठे?
दरम्यान, लॉकडाउनमध्ये अवैध दारू विक्री केल्याप्रकरणी शिवसेना उपतालुका प्रमुख बाबू सावंत याच्यावर पोलिसांनी कारवाई केली होती. पोलिसांनी दारूदेखील जप्त केली होती.