मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. आरक्षणासंदर्भात कोणताही निकाल येत नसल्याने मराठा समाजामध्ये आक्रमक झाला आहे. आजपासून राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलनासाठी मुंबईत येणाऱ्या मराठा तरुणांना ठिकठिकाणी अडवण्यात येत असल्याचा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
आघाडी सरकारचं मोघलाईचं राज्य सुरु आहे. आंदोलनकर्त्या मराठा तरुणांवर केसेस दाखल करण्यात आल्या.अधिवेशन चालू असताना लोकशाही मार्गाने आंदोलनासाठी मुंबईत येणाऱ्या मराठा तरुणांना ठिकठिकाणी अडवण्यात येत आहे.तरुणांच्या संयमाचा अंत पाहू नका.@CMOMaharashtra @AnilDeshmukhNCP pic.twitter.com/4zmYc19mmO
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) December 14, 2020
आघाडी सरकारचं मोघलाईचं राज्य सुरु आहे. आंदोलनकर्त्या मराठा तरुणांवर केसेस दाखल करण्यात आल्या. अधिवेशन चालू असताना लोकशाही मार्गाने आंदोलनासाठी मुंबईत येणाऱ्या मराठा तरुणांना ठिकठिकाणी अडवण्यात येत आहे. तरुणांच्या संयमाचा अंत पाहू नका, असा इशारा दरेकर यांनी दिला आहे.
प्रवीण दरेकर म्हणाले की, या सरकारच्या काळात मोघलाईचे राज्य सुरू असून, सरकारच्या विरोधात बोलले की जेलमध्ये टाकले जात आहे. मराठा तरुणांना आंदोलनासाठी परावनगी दिली जात नाही. आंदोलन करण्यासाठी येणाऱ्यांना पुणे, मुंबई, नाशिक अशा विविध ठिकाणी अडवले जात आहे. सरकारने दखल घ्यावी. नजरअंदाज केल्यास सर्व हाताबाहेर जाईल.