अमरावती : भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या गाड्यांचा ताफा अडवल्याची माहिती आहे . अमरावती जिल्ह्यातील वाढते कोरोना रुग्ण, वाढीव बिलं, बेडची कमतरता आणि प्रशासनाचा ढिसाळ कारभारामुळे भाजप युवा मोर्चाने अशाप्रकारे आंदोलन केलं. त्यामुळे राजेश टोपेंना रस्त्यात गाडी थांबवत त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावे लागले.
राजेश टोपे यांनी अमरावती जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा घेतला. यावेळी पालकमंत्री यशोमती ठाकूर,औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे,स्थानिक लोकप्रतिनिधी, विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने अध्यक्ष प्रणित सोनी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले होते. यावेळी राज्य शासनाकडून तसेच स्थानिक प्रशासनाकडून कोरोना काळात उपाययोजना झाल्या पाहिजे. तसेच स्थानिक प्रशासनाकडून भोंगळ कारभार लवकरात लवकर बंद व्हावा अशी मागणी यावेळी करण्यात आली होती.
Read Also :
अजितदादांचे वरिष्ठ किती ‘इममॅच्युअर’ आणि… डिलिट केलेल्या ‘त्या’ ट्विटवरून भाजपची टीकाhttps://t.co/zy8inSc0tu#AjitPawar #TusharBhosale #NCP #BJP@AcharyaBhosale
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 26, 2020