राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात नसून भगवान रामाच्या विरोधात आहे, अशी टीका भाजप नेत्या उमा भारती यांनी केली. पवारांनी राम मंदिराच्या भूमिपूजनावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला होता.
“शरद पवार यांचे हे वक्तव्य रामद्रोही आहे. ते पंतप्रधान मोदींच्या विरोधात नसून भगवान राम यांच्याविरोधात आहे.” असं उमा भारती म्हणाल्या. “आम्ही कोरोनाशी लढण्यावर उपाययोजना करत आहोत, पण मंदिर बांधून कोरोना जाईल असं काही जणांना वाटतं” असा टोला लगावत पवारांनी मोदी सरकारला आर्थिक नुकसानाकडे प्राधान्याने लक्ष देण्याचा सल्ला काल सोलापूर दौऱ्यात दिला होता.
दरम्यान, नेपाळचे पंतप्रधान ओली यांना भगवान राम यांचा जन्म नेपाळमध्ये झाला, असे वाटत असेल तर त्यांनी तिथे राम मंदिर बांधावे आणि त्याची पायाभरणी करावी” असे उत्तरही उमा भारती यांनी दिले.