IMPIMP
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी- काॅंग्रेसचे मत फुटतील; भाजप आमदाराचा दावा राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी- काॅंग्रेसचे मत फुटतील; भाजप आमदाराचा दावा

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी- काॅंग्रेसचे मत फुटतील; भाजप आमदाराचा दावा

मुंबई : देशाच्या नव्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. 15 व्या राष्ट्रपती पदासाठी एनडीएतर्फे द्रौपदी मुर्मू आणि विरोधात युपीएचे यशवंत सिन्हा उमेदवार आहेत. त्यासाठी 4,800 निर्वाचित खासदार व आमदार मतदान करतील. राष्ट्रपतींंसाठी आज संसद भवनात आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये मतदान होणार आहे. यानिवडणुकीत लोकसभेचे 543 खासदार आणि राज्यसभेचे 233 खासदार मतदान करतील. तसेच देशातील 4 हजार 33 आमदार मतदान करतील.

“पैशाची खेळी करता येत नसल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीने तो निर्णय रद्द ठरविला होता” 

या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची मते फुटतील असा दावा करण्यात येत आहे. यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, 70 टक्क्यापेक्षा जास्त मते एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मिळुन त्या विजयी होतील. राज्यसभेला शिवसेना सोबत नसताना आम्हाला 10 मते जास्त पडली होती. विधान परिषदेत 22 मते अतिरिक्त पडली. आता तर शिवसेना सोबत आहे. त्यामुळे 200 पेक्षा जास्त मतदान होईल. जे कुणी मागच्या वेळी विधानसभा अध्यक्ष, बहुमत चाचणीला नव्हते ते सुद्धा एनडीएच्या उमेदवाराला मतदान करतील असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

“दुसऱ्याच्या घरातील जेवणाचा खर्च मी का देऊ? राऊतांच्या आरोपावर पाटलांचे स्पष्टीकरण 

तसेच भाजप एक कुटुंब आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्याची काळजी घेतली जाते. आजारी आमदारांची विचारपुस केली जाते. परंतु कॉंग्रेसमध्ये होत नाही. त्यामुळे नाना पटोले अशी विधाने करतात असा म्हणत त्यांनी नाना पटोले यांच्यावर देखील टोला लगावला. यातच एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित आहे. त्यांना रेकॉर्ड ब्रेक समर्थन मिळेल. विरोधक आमदार पक्षमर्यादा झिडकारून द्रौपदी मुर्मू यांना मतदान करतील,  असं भाजप आमदार आशिष शेलार हे म्हणाले आहेत.

“एकाही आमदाराची भावना नाही की, भाजप सोडून दुसरीकडे जावे” 

याचबरोबर कॉग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार हे युपीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारालाच मतदान करतील, मतं फुटणार नाहीत असे कॉग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे म्हणाले आहेत. त्यामुळे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या मतदाना सुरूवात झाली आहे. देशभरातून विविध राज्यांच्या विधानभवनातून आमदार या निवडणुकीसाठी मतदार करीत आहेत.

Read also