मुंबई : सुशांतसिंग राजपूत प्रकरणात बडे नेते अभिनेते आणि ड्रग माफिया याना महाराष्ट्र सरकारचा वाचवण्याचा प्रयत्न संपूर्ण देशाने पाहिला . या कालखंडात आक्रमकपणे सुशांतला न्याय मिळावा म्हणून आम्हा सर्वांची प्रामाणिक धडपड संपूर्ण देशाने पाहिलीं हेच सरकारच्या जिव्हारी लागलं, असेही राम कदम यांनी म्हटले आहे. सुशांतसिंह राजपूत प्रकरणात महाविकास आघाडीच्या बड्या मंत्र्याचा हात असल्याचा आरोप भाजप सुरुवातीपासून करत आहे. त्यांचा रोख पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर आहे.
त्यानंतर राज्यातील काँग्रेस नेत्यांनी शिवसेनेची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.छत्रपती शिवरायांना मानणारा मी मावळा आहे. उद्या नव्हे ,या क्षणाला सांगाल त्या ठिकाणी मी यायला तयार आहे. मी व माझ्या संपूर्ण कुटुंबाची नार्को टेस्ट करावी. मी तयार आहे. पण मात्र या प्रकरणात अडकलेले तुमच्या सरकारचे बडे नेते, मंत्री नार्को टेस्ट करायाला तयार आहेत का ? ते तपासून पहा,” असा टोला लगावत भाजप आमदार राम कदम यांनी सचीन सावंत यांना उत्तर दिले आहे.
विवेक मोईत्रा (दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे तत्कालिन स्वीय सहाय्यक)यांच्यापासून राम कदम यांना ड्रग विक्री पुरवठ्याबाबत माहिती आहे. त्यांचे बॉलिवूड संबंधही घनिष्ठ आहेत. त्यामुळे त्यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी आम्ही करत आहोत. भाजपा कार्यालयात ५३ वेळा फोन करून संदीप सिंग कोणाशी बोलत होता व भाजपाचे ड्रग माफिया संबंध ही उघड होतील,” अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचीन सावंत यांनी ट्वीटद्वारे केली आहे, त्याला कदम यांनी उत्तर दिले आहे.
छत्रपती शिवरायांना मानणारा मी मावळा आहे उद्या नव्हे ,या क्षणाला सांगाल त्या ठिकाणी मी यायला तयार आहे मी व माझ्या संपूर्ण कुटुंबाची नार्को टेस्ट करावी. तयार आहे पण मात्र या प्रकरणात अडकलेले तुमच्या सरकारचे बडे नेते , मंत्री नार्को टेस्ट करायाला तयार आहेत का ? ते तपासून पहा https://t.co/WEawt8zWLJ
— Ram Kadam (@ramkadam) September 4, 2020