अहमदनगर : महाराष्ट्रात कोरोनारुग्णांसाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिव्हीरच्या तुटवड्यावरून ठाकरे सरकार आणि भाजप आमने-सामने आले आहेत. यातच आता अहमदनगरचे भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी जिल्ह्यात 300 रेमडेसिव्हीर इंजेक्शनचे मोफत वाटप केले आहे.
कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रेमडिसिव्हीरचा तुटवडा महाराष्ट्रामध्ये किंबहुना संपूर्ण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. अशा स्थितीत विखे कुटुंबाने अहमदनगर जिल्ह्यात 300 रेमडेसिव्हीर इंजेक्शनचे मोफत वाटप केले.
कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रेमडिसिव्हीरचा तुटवडा महाराष्ट्रामध्ये किंबहुना संपूर्ण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात जाणवत आहे.
अशा परिस्थितीत त्या इंजेक्शनबाबत होणारे राजकारण, आरोप-प्रत्यारोप या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन आज विखे पाटील कुटुंबियांच्या वतीने अहमदनगर 1/4 pic.twitter.com/YRLnnQ8U5w
— Dr. Sujay Vikhe Patil (@drsujayvikhe) April 19, 2021
यात अहमदनगर जिल्ह्याच्या सिव्हिल हॉस्पिटलला 100 इंजेक्शन दिले आणि त्यांना ते केवळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांनाच देता येणार आहेत.त्याचबरोबर दुसरे जिल्हा रुग्णालय म्हणून घोषित करण्यात लेल्या साईबाबा संस्थानच्या हॉस्पिटलला देखील 100 इंजेक्शन देण्यात आले आहेत आणि ते देखील तिथे उपचार घेत असलेल्या रुग्णांसाठीच वापरले जातील. तसेच प्रवरा हॉस्पिटल येथे 200 बेडचे कोविड हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहे.
डॉ. सुजय विखे पाटलांनी राजधानी दिल्लीहून तीनशे रेमडेसिवीर इंजेक्शन आज नगर जिल्ह्यात आणली. ज्यात सध्या या इंजेक्शनचा तुटवडा आहे. भाजप आणि ठाकरे सरकारमध्ये यावरून जुंपल्याचे दिसत आहे. यातच आता विखे पाटलांनी अहमदनगर जिल्ह्यांमध्ये याचे मोफत वाटप केले आहे.