सातारा – साताऱ्यात मराठा आरक्षणासंदर्भात खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावरुन ठाकरे सरकारवर निशाणा साधला. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी करुन दाखवलं. पण त्यांना नाव ठेवली. मग आता तुम्ही सत्तेत आहात ना, तर मग ते करुन दाखवा, अशी आक्रमक भूमिका खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतली.
ज्यांनी निवडून दिलं. ती लोक तुम्हाला खाली खेचू शकता. वयाचा आदर आहे. कोणाला नाव घेऊन मोठं करणार नाही. यात सर्वच दोषी आहेत. करायचं तर हो म्हणा, नाहीतर लोक तुम्हाला रस्त्याने फिरु देणार नाही. कोरोना आहे, लोकं शांत आहेत, कितीवेळ शांत राहतील, असा इशाराही उदयनराजेंनी दिला आहे.
अॅक्शनला रिअॅक्शन होणारच. पण जर तो उद्रेक घडला तर त्याला जबाबदार कोण? जे काही नुकसान होईल त्याला ही लोक जबाबदार असतील. निवडणुका आल्यावर आश्वासन द्यायचं. करणार, झालं, झाल्यात जमा आहे, पण कधी. आणि दुसऱ्यांना नाव ठेवायची. निदान थोडी तर लाज बाळगा. जातीचा राजकारण करण्यापेक्षा मेहरबानी करुन राजीनामा द्या आणि घरी बसा, अशी टीका उदयनराजेंनी केली.
Read Also –
“..तेव्हा पोपट घेऊन चंद्रकांत पाटील चिठ्ठ्या काढत होते”
‘नाचता येईना अंगण वाकडे’ अशी उद्धव ठाकरेंची अवस्था, नारायण राणेंची टीका
चंद्रकांत पाटलांनी कोल्हापुरातून निवडणूक लढवली तर त्यांचं डिपॉझिट जप्त होईल : मंत्री हसन मुश्रीफ
सूडाच्या मार्गाने जाण्यास आम्हाला भाग पाडू नका, मुख्यमंत्र्यांचा भाजपला इशारा