कल्याण : मेहबूब शेख यांच्या उपस्थितीवर हरकत घेणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांनी समोर यावे, त्यांना चांगलाच धडा शिकवू”, असा खुले आव्हान कल्याण डोंबिवली राष्ट्रवादीचे युवाध्यक्ष सूधीर पाटील यांनी दिले आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर काही दिवसांपूर्वी बलात्काराचा आरोप झाला होता. यावरून भाजपच्या कार्यकर्त्यांनी मेहबूब शेख यांनी एका कार्यक्रमास उपस्थित राहू नये, अशी मागणी केली होती. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीने थेट धडा शिकवण्याचा इशारा दिला आहे. याबाबत टिव्ही9 मराठीने वृत्त दिले आहे.
कल्याण पश्चिमेतील भानूसागर सिनेमा परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी स्वप्नील रोकडेंच्या वतीने रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेहबूब शेख यांना या कार्यक्रमात सहभागी होण्याची परवानगी दिली जाऊ नये, अशी मागणी करणारे पत्र भाजपच्या युवा मोर्चाच्या वतीने पोलिसांना देण्यात आले होते. मात्र भाजपच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर देखील शेख कार्यक्रमात उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमादरम्यान बोलताना, भाजप कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात पत्र देऊन हरकत घेतली आहे. त्यांनी समोर रस्त्यावर यावे. त्यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच धडा शिकविला असता, अशा इशाराच राष्ट्रवादीचे युवाध्यक्ष सूधीर पाटील यांनी दिला.
Read Also :
- ‘राहुल गांधींनी शिवसेनेला जागा दाखवली’
- गृहमंत्री अनिल देशमुखांनी पोलिसांसाठी केली ‘ही’ मोठी घोषणा
- ‘पुरंदरमधील विमानतळ बारामतीला पळवण्याचा डाव’ शिवसेना नेत्याचा थेट पवारांवर निशाणा
- ‘रोहित पवारांचा नकलीपणा बघायचा असेल तर हे वाचाच’
- महाविद्यालय सुरू करण्याची मागणी, अभाविप कार्यकर्त्यांनी भरवला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वर्ग