सध्या लोकांना फिट ठेवण्यावर सध्या आमचा भर असून विरोधीपक्ष मात्र डिझास्टर टुरिजममध्ये व्यस्त असल्याची टीका पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली होती या टीकेला आता भाजपने प्रत्युत्तर दिले आहे.
विरोधी पक्षनेत्यांच्या महाराष्ट्र दौऱ्यांवर डिझास्टर टूरीझम अशी टीका करणाऱ्या पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची भाजप आमदार अमित साटम यांनी खिल्ली उडवली असून आदित्यबाळा तू अजून कोषात आहेस, असा टोला लगावला आहे.
पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे फक्त घरात बसून बेफाम विधाने करीत आहेत. अशा परिस्थितीत प्रत्यक्ष मैदानात उतरण्याचे धाडस दाखवा. वरळी कोळीवाडा हॉटस्पॉट असताना तुम्ही तेथे तळ ठोकून होतात असा एकतरी फोटो दाखवा. तुम्ही अजून कोषात आहात, तेव्हा निदान तोंड तरी बंद ठेवा, अशी टीका साटम यांनी केली आहे.
दरम्यान, “कोरोना संकटात विरोधी पक्षाचे नेते सर्वसामान्यांना मदत करण्याऐवजी हेल्थ टूरिज्म किंवा डिझॅस्टर टूरिज्म म्हणून फिरत आहेत. मात्र, आम्ही तसं करत नाही. आम्ही लोकांची मदत कशी करता येईल, यासाठी प्रयत्न करत आहोत”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली होती