सातारा : भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या बालेकिल्ल्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. आमदार शिवेंद्रराजेंचे कट्टर समर्थक मानले जाणाऱ्या शशिकांत वाईकर यांनी समर्थकांसह राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले. राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे, दीपक पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.
चंद्रकांत पाटलांना अफवा पसरवण्याची सवय, हवेत गोळीबार करू नका – संजय राऊत
शिवेंद्रराजे समर्थक आणि पंचायत समितीचे उपसभापती अरविंद जाधव यांनी नुकतीच शशिकांत वाईकरांवर टीका केली होती. “टेंडरसाठी राजकारणात शिरलेल्या ठेकेदारांना परळी भाग कधीही थारा देणार नाही, ठेकेदारांना राष्ट्रवादीत का घ्यायचे? याचा विचार पक्षाने करण्याची गरज आहे” असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं.
“शशिकांत वाईकर यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विकासाचे नव्हे, तर संधीसाधू राजकारण केले आहे. ज्यांनी आजवर परळी भागाच्या विकासासाठी एक दमडीही खर्च केली नाही, परळी भागातील लोकांसाठी कुठेही कधीही उभे राहिले नाहीत. कोरोना, अतिवृष्टी, पुनर्वसन यासारख्या कोणत्याही सामाजिक प्रश्नावर कवडीचेही काम केले नाही, अशा मंडळींनी केवळ टेंडर मिळण्याच्या हेतूने राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. ज्यावेळी परळी भागातील जनता विविध समस्यांनी त्रस्त होती, त्या वेळी ही मंडळी कुठे होती?” असा सवालही अरविंध जाधव यांनी पत्रक काढून उपस्थित केला होता.
शिवेंद्रराजे कोण आहेत ?
शिवेंद्रराजे भोसले हे राष्ट्रवादीच्या तिकीटावर 2004 पासून सलग तीन वेळा साताऱ्यातून आमदारपदी निवडून आले. त्यानंतर 2019 मध्ये विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीला रामराम ठोकत त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपप्रवेश केला. त्यानंतर भाजपच्या तिकिटावर ते सातारा मतदारसंघातून निवडून आले. शिवेंद्रराजे आणि उदयनराजे हे चुलतबंधू. मात्र गेल्या काही काळात दोघांमध्येही विस्तव जात नव्हता. आधी दोघंही राष्ट्रवादीत होते, नंतर दोघंही भाजपात गेले. भाजपप्रवेशाच्या वेळी दोन्ही राजेंचं मनोमीलन झाल्याचं पाहायला मिळालं.
Read Also :
- राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या पुतणीचा काँग्रेसच्या आमदाराकडून छळ; पी. एन. पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल
- राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर, केवळ ठाकरे सरकारचा नाकर्तेपणाच जबाबदार – प्रविण दरेकर
- शरद पवारांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्रं यावं; बाळासाहेब थोरातांचे खुले आवाहन
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत शिवसेना 80 ते 90 जागा लढविणार – संजय राऊत
- लावणी सम्राज्ञी सुरेका पुणेकर राष्ट्रवादीत ठुमका लावणार; मुंबईत रंगणार पक्षप्रवेश सोहळा