सोलापुर : 2019 साली लोकसभा निवडणुकीपुर्वी भाकीत केलेलं अंदाज तंतोतंत खरे ठरले होते. त्यामुळे यंदा देखील सोलापुरच्या कापड व्यावसायिक विशाल शहा यांच्या भाकिताकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. त्यानंतर २० एप्रिल २०२४ रोजी आगामी लोकसभा निवडणुकीबाबत काही भाकितं केली आहे. यामध्ये देशात भाजप ४०० पार जागा मिळवणार का ? तसेच राज्यातील प्रतिष्ठेच्या लढती बारामती, माढा याबाबत त्यांनी धक्कादायक भाकितं वर्तवली आहेत.
सोलापुरमधील विशाल शाह यांनी गतनिवडणुकीबाबत सोशल मीडियावर काही भाकित वर्तवली होती. यामध्ये त्यांनी २० एप्रिल २०१९ रोजी भाजपला ३०७ आणि एनडीए आघाडीला ३५० जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला होता. यानंतर निकालच्यावेळी सर्व एक्झिट पोलचे अंदाज चुकले होते. मात्र शाह यांचा अंदाज जवळपास ९९.२४ टक्के इतका तंतोतंत खरा ठरला होता. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत काय भाकित करणार त्याकडे लक्ष लागून राहिलं आहे.
हेही वाचा…आढळरावांच्या प्रचारासाठी महेश लांडगे मैदानात, भोसरी मतदारसंघात बैठकांचा सपाटा
विशाल शाह यांनी शनिवारी २० एप्रिल २०२४ रोजी फेबसबुकवर भाकित वर्तवताना पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील. मात्र भाजपला ४०० जागा मिळणार नसून भाजपला ३३४ तर सहयोगी पक्षाला ५५जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केलाय. यातच सोलापुर जिल्ह्यातील माढा आणि सोलापुर मतदारसंघातून रणजितसिंह निंबाळकर, राम सातपुते निवडणुक जिंकतील. याठिकाणी धैर्यशील मोहिते पाटील आणि प्रणिती शिंदे यांचा पराभव होईल असेही त्यांनी म्हटलंय.
दुसऱ्या बाजूला राज्यात एव्हाना देशात सर्वात चर्चेत असेलल्या बारामती लोकसभा मतदारसंघाबाबतही त्यांनी अंदाज व्यक्त केला आहे. बारामतील लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवारांचा विजय होणार असून सुप्रिया सुळे यांचा पराभव होणार आहे. तर सातारा मतदारसंघातून उदयनराजे विजयी होणार आहेत. विशाल शाह यांनी याआधीही अनेक भाकितं वर्तवली आहेत. त्यांची भाकित आजपर्यंत ९९ टक्के खरी ठरली आहेत. त्यामुळे यावेळी केलेली भाकितांकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय.
READ ALSO :
हेही वाचा…“विरोधकांची प्रचाराची वैचारिक पातळी घसरलीय”, सुनील तटकरेंचा हल्लाबोल
हेही वाचा…आढळरावांच्या प्रचाराला वेग, वाघोली दौऱ्यात लोकांचा उदंड प्रतिसाद
मोठी बातमी…! धाराशिवमध्ये ७७ उमेदवारांनी १७५ खरेदी केले अर्ज
हेही वाचा..अर्चना पाटील की ओमराजे निंबाळकर ? धाराशिवच्या कोणत्या उमेदवारांची संपत्ती जास्त ?
हेही वाचा…पहाटेचा शपथविधी कसा आणि का झाला ? अजित पवारांचं दमदार पुरंदरमधील दमदार भाषण