धाराशिव : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काल महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांना संधी दिली आहे. निंबाळकर यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज भरला आहे.
यातच आता केंद्रीय निवडणुक आयोगाकडून अर्चना पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांची माहिती प्रकाशित करण्यात आली आहे. यामध्ये दाखल केलेल्या शपथपत्रात दोन्ही उमेदवारांनी आपल्याबाबत सविस्तर माहिती सादर केली आहे. यामध्ये उमेदवारांची एकूण संपत्ती, उत्तन्नाचे स्त्रोत तसे कौटुंबिक माहिती सादर केली आहे. यामध्ये ओमराजे निंबाळकर यांच्या संपत्तीपैकी अर्चना पाटील यांची संपत्ती जास्त असल्याचे दिसून आले आहे.
ओमराजे निंबाळकर यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात २०२२ साली १९ लाख ८४ हजार इतके वार्षिक उत्पन्न दाखवले आहेत. तर त्यांच्या पत्नी संयोजनी निंबाळकर यांची संपत्ती ७ लाख ८३ हजार इतकी असून ओमराजे निंबाळकर यांच्यावर एक फौजदारी गुन्हा प्रलंबित आहे. यातच ८ लाख ५७ लाख रोक रक्कम तर निंबाळकरांच्या पत्नीच्या नावे ५ लाख १२ हजार रोख रक्कम नमुद करण्यात आलीय. यातच ओमराजे निंबाळकर यांची बॅंकेत १ कोटी ७० लाखांची गुंतवणुक असून त्यांच्या पत्नीच्या नावे ५० लाखांची गुंतवणूक दाखवण्यात आलीय.
हेही वाचा…“कोकणाचे नंदनवन केल्याशिवाय गप्प बसणार नाही”, तटकरेंनी नागरिकांना दिलं आश्वासन
ओमराजे निंबाळकर यांच्याकडे एक इनोव्हा, तर एक क्रॉस गाडी असून त्यांच्या पत्नीकडे एकही वाहन नाही. तर त्यांच्या नावे ११३ ग्रम सोने, ४८ हजारांची डायमंड अंगठी तर पत्नीकडे ३०० ग्रम सोने, असल्याचं म्हटलं आहे. त्याचबरोबर एक रिव्हॉलर असून त्यांच्या नावे २२ लाखांचं वैयक्तिक कर्ज देखील असून २ लाख ५० हजार बॅंकेचं कर्ज आहे.
दुसऱ्या बाजूला धाराशिवच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या संपत्तीबाबतही माहिती निवडणुक आयोगात सादर करण्यात आलीय. त्यांच्याकडे २०२२-२३ मध्ये ७ लाख ७३ हजार तर पती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नावे ६५ हजार ४७ हजार इतकं दाखवण्यात आलं आहे. तर अर्चना पाटलांवर एकही गुन्हा नसून त्यांच्याकडे बॅंकेत २२ लाख ९७ हजार रूपये असून बॉण्ड आणि इतर मध्ये २२ लाखांची गुंतवणुक करण्यात आलीय.
हेही वाचा…अखेर उत्तम जानकरांनी मौन सोडले, भाजवर केलेत गंभीर आरोप, म्हणाले..
तर राणाजगजितसिंह पाटील यांच्या नावे २ कोटी ६ लाख गुंतवणुक तर अर्चना पाटील यांच्याकडे ८ लाख ९१ हजार कर्ज आहे. तर राणा यांच्या नावे ५ कोटी ८७ लाख रूपयांचं कर्ज दाखवण्यात आलंय. अर्चना पाटील यांच्याकडे १ लाख ४१ हजार तर राणा यांच्याकडे ४८ लाख ४५ हजार रूपयांची शासकीय देणगी असून अर्चना पाटलांकडे एकही गाडी नाही. तर राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडे एक दुचाकी, दोन चारचाकी गाड्या आहेत.
दरम्यान, अर्चना पाटील यांच्याकडे ३ किलो ६९० तर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडे १२७ ग्रॅम सोन असून ३ कोटी ८६ लाखांची जमीन आहे. तर अर्चना पाटील यांच्या नावे १ कोटी ४७ लाखांची जमीन नोंद असून १५ कोटींची नॉन एॅग्री बिल्गिंड आहे. अर्चना पाटील यांना ६६ लाख ९५ हजार रूपयाचे देणे असून राणा यांना ५ कोटी ७८ लाख रूपयांचे देणे आहे. तर अर्चना पाटील या इंजिनियर आहेत. त्यांचा उत्पन्नाचं स्त्रोत शेती आणि नोकरी आहे.
READ ALSO :
हेही वाचा…पहाटेचा शपथविधी कसा आणि का झाला ? अजित पवारांचं दमदार पुरंदरमधील दमदार भाषण
हेही वाचा…आढळरावांच्या प्रचारासाठी महेश लांडगे मैदानात, भोसरी मतदारसंघात बैठकांचा सपाटा