रायगड : नेतृत्वात बदल केला म्हणून माझ्यावर टिका केली जात आहे. परंतु अनंत गिते यांनी तर जनतेचा विश्वासघात केला आहे. रामदास कदम, सुर्यकांत दळवी यांनी निवडणुकीला मदत केली, त्यांचा देखील गीतेंनी विश्वासघात केला. हेच नव्हे तर कुणबी समाजाचाही गींतेनी विश्वासघात केला. असा हल्लाबोल रायगडचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी माजी मंत्री आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गिते यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. निवडणुकीच्या अनुषंगाने मंडणगाव येथे महायुतीची जाहीर सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा…आढळरावांनी प्रचारात घेतली मोठी आघाडी, हडपसर मतदारसंघात लोकांचा मोठा प्रतिसाद
पुढे बोलतांना तटकरे म्हणाले की, कालबाह्य झालेल्या कायद्यात बदल होत असतात. परंतु घटनेत बदल कधीच होणार नाही. तरी जाणीवपूर्वक घटना बदलली जाणार आहे, अशी अफवा पसरवली जात आहे. त्यातून नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्याचा डाव आहे. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली ही घटना कधीच बदलली जाणार नाही, असा विश्वास यावेळी जनतेला त्यांनी दिला.
एनडीए सरकार पुन्हा सत्तेत येणार यात शंका नाही. या सरकारच्या माध्यमातून नवनवीन कल्याणकारी योजना आणण्याचे काम करणार असल्याचे सांगतानाच केंद्रसरकारच्या माध्यमातून तुम्ही सुचवलेली प्रत्येक कामे पूर्ण करणार असल्याचे स्पष्ट केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जन्मगाव आंबवडे आपल्या जिल्ह्यात आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड आहे. अशा या पावनभूमीत आपल्याला विकासकामे तुम्हाला सांगता येणार नाही इतकी करायची आहेत. त्यामुळे कोकणाचे आणि या मतदारसंघाचे नंदनवन केल्याशिवाय गप्प बसणार नाही. असं आश्वासन देखील तटकरे यांनी जनतेलं दिलं.
हेही वाचा…बारामती लोकसभा मतदारसंघात मनसेकडून सुनेत्रा पवारांचा प्रचार
दरम्यान, महायुतीच्या या जाहीर सभेला उद्योगमंत्री आणि रायगड जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम, दापोली – मंडणगडचे आमदार योगेश रामदास कदम माजी, आमदार सुर्यकांत दळवी, आरपीआय जिल्हा सरचिटणीस आदेश मर्चंडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष केदार साठे, प्रकाश शिगवण आदींसह महायुतीचे तालुकाध्यक्ष, तालुकाप्रमुख आणि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
READ ALSO :
हेही वाचा…अखेर उत्तम जानकरांनी मौन सोडले, भाजवर केलेत गंभीर आरोप, म्हणाले..
हेही वाचा…अखेर ठरलं ! मुरलीधर मोहोळांसाठी पुण्यात ‘या’ दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा
हेही वाचा…बीड लोकसभेतून ज्योती मेटे यांची माघार, पत्रकार परिषदेतून केली घोषणा
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंना पंतप्रधानपदाची संधी मिळाली तर त्याला शरद पवारांचा पाठिंबा”