पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्याच्या सूचना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. त्यानुसार बारामती लोकसभा मतदारसंघातही मनसेचे कार्यकर्ते सक्रीय झाले आहेत. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी बारामती लोकसभा मतदारसंघातील मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बारामती येथे पार पडली.
या बैठकीला मनसेचे नेते दिलीप धोत्रे, मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष सुधीर पाटसकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, मनसेचे जिल्हाध्यक्ष पोपट सुर्यवंशी, संतोष दासवडकर यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघातील मनसे कार्यकर्ते जोमाने काम करून सुनेत्रा पवार यांच्या विजयात वाटा उचलतील. अशई ग्वाही मनसे पदाधिकाऱ्यांनी यावेळी सुनेत्रा पवारांना दिली.
दरम्यान, मनसे नेते राज ठाकरे यांच्यासह ठाकरे कुटुंबाशी माझा व्यक्तिगत स्नेह राहिला आहे. त्यातही शर्मिला ठाकरे या माझ्या खास मैत्रीण असल्याचे सुनेत्रा पवार यांनी यावेळी सांगितले. मला निवडणुकीत सहकार्य करणाऱ्या मनसैनिकांची जाणीव ठेवून त्यांच्या हाकेला नेहमीच प्रतिसाद असेल अशी ग्वाही देखील सुनेत्रा पवार यांनी दिली.
READ ALSO :
हेही वाचा…तटकरेंच्या प्रचाराचा नारळ फोडला, सुनील तटकरेंच्या प्रचारासाठी अनिकेत तटकरे सक्रीय
हेही वाचा..“माढा मतदारसंघात कथित चाणक्याचं विशेष विमान क्रश ! तुतारीचे ‘उत्तम’ स्वर गुंजणार!
हेही वाचा…इंदापुरमधून भरघोस मताधिक्य देऊ, हर्षवर्धन पाटलांची अजित पवारांना ग्वाही
हेही वाचा…Live Ajit Pawar | अजित पवारांच्या हस्ते सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला बारामतीतून सुरूवात
हेही वाचा…“मोदींविरोधात जनतेत संतापाची लाट “, लातुरमधून बाळासाहेब थोरांताचा हल्लाबोल