सोलापुर : महायुतीकडून माढा लोकसभेतून विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानंतर मोठ्या राजकीय हालचाली सुरू झाल्या. सुरूवातीला धनगर समाजाचे नेते महादेव जानकर यांना शरद पवारांकडून उमेदवारी दिली जाणार असं सांगण्यात येत होतं. मात्र फडणवीसांनी डाव टाकत जानकरांना महायुतीकडून परभणीची जागा दिली. त्यानंतर शरद पवारांना पलटवार करत थेट माढ्यातील मोहिते पाटलांना आपल्याकडे घेऊन महायुतीला जोरचा झटका दिला. त्यानंतर मोहिते पाटलांचे कट्टर विरोधक उत्तम जानकरांवर दोन्ही बाजूने डाव टाकण्यास सुरूवात झाली. मात्र या खेळात शरद पवारांना यश मिळतांना दिसत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून माढा लोकसभा मतदारसंघ राज्याच्या राजकारणाचा केंद्र बिंदू ठरला आहे.
भाजपने पुन्हा रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी दिल्यानंतर मोहिते पाटील घराणे नाराज झालेत. फडणवीसांसह भाजपच्या नेत्यांनी मोहिते पाटलांना मनवण्याचा प्रयत्न केला. मात्र धैर्यशील मोहिते पाटलांनी शरद पवारांचा हात धरला. त्यानंतर शरद पवारांनी धैर्यशील मोहिते पाटलांना माढ्याची उमेदवारी दिली. त्यानंतर विरोधकांनी धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांना सक्रीय करत धैर्यशील मोहिते पाटलांच्या विरोधात खेळी करण्यास सुरूवात केली. उत्तम जानकर यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील यादरम्यान घेतली. यावर ऑगस्टमध्ये विधानसभा निवडणुकीत तुम्हाला आमदार केलं जाईल. असं म्हणत जानकरांना आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न केला. मात्र शरद पवारांनी मधातच डाव टाकत जानकरांना आपल्याकडे घेतलं.
हेही वाचा…“अर्चना पाटील या देखील घरातलीच सुन”, धाराशिवच्या सभेतून अजित पवारांचा शरद पवारांना टोला
यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी उत्तम जानकर यांची भेट घेतली. त्यानंतर जवळपास ३० वर्षांचे वैर संपुर्ष्टात येून उत्तम जानकर आणि मोहिते पाटील घराण्याने एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तम जानकर यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. माढाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील, उत्तम जानकर, महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते वेळापुरमध्ये एकत्र आलेले पाहायला मिळाले.
दरम्यान, माढ्यात शरद पवारांनी रणजित सिंह निंबाळकर यांच्या भोवती मोठी रणनीती आखली आहे. मोहिते पाटील घराणे त्याचबरोबर उत्तम जानकर यांचा पाठिंबा आणि स्वत : शरद पवार सोबत असल्याने निंबाळकरांचा निभाव लागणार का ? अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर आता माढा मतदारसंघात कथित चाणक्याचं विशेष विमान क्रश ! तुतारीचे ‘उत्तम’ स्वर गुंजणार! लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी येणाऱ्या इतरांचंही स्वागत. असे रोहित पवारांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…इंदापुरमधून भरघोस मताधिक्य देऊ, हर्षवर्धन पाटलांची अजित पवारांना ग्वाही
हेही वाचा…Live Ajit Pawar | अजित पवारांच्या हस्ते सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला बारामतीतून सुरूवात
हेही वाचा…“मोदींविरोधात जनतेत संतापाची लाट “, लातुरमधून बाळासाहेब थोरांताचा हल्लाबोल