पुणे : बारामती लोकसभेच्या महायुतीकडून काल सुनेत्रा पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. त्याआधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सुनेत्रा पवार यांनी पुण्यातील दगडुशेठ गणपतीचं दर्शन घेतलं. त्यानंतर महायुतीची भव्य सभा पार पडली. तर याच दरम्यान अजित पवारांनी संभाजी भिडे यांची देखील भेट घेतली. यावरून आता राष्ट्रवादी शरद पवार गटातील आमदार रोहित पवारांनी अजित पवार यांच्यावर खोचक टिप्पणी केलीय.
हेही वाचा…आढळराव पाटलांना खासदार करण्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी घेतली शपथ
रोहित पवार म्हणाले की, अजितदादा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी आपण सुनेत्रा काकींसह दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलंत, याचा आनंद आहे. पण, क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी देशात सर्वप्रथम स्त्री शिक्षणाची ज्योत जिथं प्रज्वलित केली, त्या समोरच असलेल्या भिडेवाड्यालाही हात जोडले असते तर अधिक आनंद झाला असता. असा टोलाही रोहित पवारांनी लगावला.
हेही वाचा..“पाच वर्षानंतर आताच माझी आठवण झाली का ?” माजी खासदाराचा भाजपला घरचा आहेर
तर नव्या संगतीच्या परिणामाने आपण तिकडं दुर्लक्ष केलं की महात्मा फुलेंबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या एका कथित गुरुजींशी आपली चर्चा झाल्याने त्यांनी भिडे वाड्याला नमस्कार न करण्याचा कानमंत्र आपल्याला दिला, हे माहीत नाही. पण बाकी काही असो, आपला ‘मोदी टू द्रौपदी’ प्रवास मात्र एक्स्प्रेस झाला. असा टोलाही रोहित पवारांनी अजितदादांना लगावला.
READ ALSO :
हेही वाचा…“अर्चना पाटील या देखील घरातलीच सुन”, धाराशिवच्या सभेतून अजित पवारांचा शरद पवारांना टोला
हेही वाचा…“ही निवडणुक गावकी-भावकीची नाही, तर…” आढळरावांनी काढला कोल्हेंचा चिमटा
हेही वाचा…नाशिकमधून भुजबळांची माघार, ना गोडसे, ना दिनकर पाटील, भाजपच्या ‘या’ नेत्याची चर्चा
हेही वाचा…सुनेत्रा पवार अन् सुनील तटकरेंनी सादर केला उमेदवारी अर्ज, अजित पवारांनीही भरला डमी फॉर्म