नाशिक : गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकच्या जागेवरून महायुतीत प्रचंड वाद निर्माण होत आहे. विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी सुरूवातीलाच उमेदवारीवर दावा ठोकल्यानंतर भाजपने देखील निवडणुक लढविण्यासाठी इच्छा व्यक्त केली. भाजपचे दिनकर पाटील यांनी तर वारंवार निवडणुक लढण्याची इच्छा बोलून दाखवली. त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मंत्री छगन भुजबळ यांचं नाव समोर आलं. यानंतर भुजबळांना महायुतीच्या नेत्यांकडून प्रचंड विरोध करण्यात आला. यातच आता भुजबळांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्याने नाशकात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे.
हेही वाचा…कॉंग्रेसने कायम प्रभू श्रीरामाला विरोध केलाय. मोहोळांचा घणाघात
यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, नाशिक लोकसभेबाबत केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासह जे. पी. नड्डा यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीत नाशिकच्या जागेबाबत मला विचारणा करण्यात आली होती. त्यावर नाशिकमधून तुम्हालाच उभं राहायचं असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी देखील म्हटलं होतं. तर शाहांनी देखील माझ्याच नावावर शिक्कामोर्तब केला होता. मात्र त्यानंतर या जागेचा तिढा वाढतच गेला. त्यामुळे आता या निवडणुकीतून माघार घेत असल्याचे मंत्री भुजबळांनी जाहीर केले आहे.
हेही वाचा…धाराशिव मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलली, कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचा भाजपात प्रवेश
भुजबळांनी नाशिकच्या जागेवरून माघार घेतल्यानंतर हेमंत गोडसे यांनी देखील त्यांच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. तसेच माझी उमेदवारी अद्यापही जाहीर केली नाही. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला लोकसभेसाठी जे काम सुरू आहे. ते पुन्हा सुरू ठेवण्यास सांगितलं असल्याची प्रतिक्रिया हेमंत गोडसे यांनी दिली आहे. त्यामुळे नाशिकच्या जागेवर आता कोण उमेदवार देणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, शिवसेना शिंदे गटासह भाजपने देखील नाशिकच्या जागेवर दावा सांगितला. भाजपचे दिनकर पाटील यांनी तर लोकसभेची तयारीही सुरू केली आहे. तसेच त्यांनी निवडणुक लढण्याची तयारीही दर्शवली होती. तसेच ज्यावेळी भुजबळांंचं नाव समोर आलं. तेव्हा दिनकर पाटील यांनी तर मोठा विरोध केला होता. अशातच आता नाशिकची जागा भाजपला जाण्याची शक्यता असून भाजपकडून प्रवक्ते प्रदीप पेशकर यांचं नाव समोर आलं आहे. त्यामुळे सर्वांची नाराजी ओढवून घेण्यापेक्षा पेशकर यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी हालचाल आता भाजपकडून सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…सुनेत्रा पवार अन् सुनील तटकरेंनी सादर केला उमेदवारी अर्ज, अजित पवारांनीही भरला डमी फॉर्म
हेही वाचा…आढळराव पाटलांना खासदार करण्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी घेतली शपथ
हेही वाचा..“पाच वर्षानंतर आताच माझी आठवण झाली का ?” माजी खासदाराचा भाजपला घरचा आहेर
हेही वाचा…Live Ajit Pawar | अर्चना पाटलांच्या प्रचारासाठी अजित पवार धाराशिवमध्ये, लाईव्ह सभा