पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात निवडणुक होत आहे. महायुतीकडून शिवाजीराव आढळराव पाटील तर महाविकास आघाडीकडून डॉ. अमोल कोल्हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आता दोन्ही उमेदवारांनी आपल्या प्रचाराची जोरदार सुरूवात केली आहे. यातच आढळरावांनी भाजपच्या नेत्या आशा बुचके यांच्या घरी भेट दिली.
शिरूर मतदारसंघात महायुतीने आढळरावांचा धुमधडक्यात सुरूवात केली आहे. शिवाजीराव आढळरावांसाठी महायुतीचे सर्वच नेते झपाटून कामाला लागले आहेत. यातच आज आढळरावांनी भाजप नेत्या आशा बुचके यांच्या जुन्नर येथील घरी भेट दिली. या भेटीत आढळरावांना निवडून आणण्याची शपथ यावेळी महायुतीच्या नेत्यांनी घेतली. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके, शिवसेना नेते शरद सोनवणे, काळे इत्यादी नेते उपस्थित होते.
हेही वाचा…लोकशाहीच्या महापर्वाला आजपासून सुरूवात, राज्यात पाच मतदारसंघात आज मतदान
दरम्यान, आशा बुचके यांच्या घरी चहापानानंतर आढळराव पाटील घरातून बाहेर पडण्यापुर्वी उपस्थितीत असलेल्या महायुतीच्या सर्व नेत्यांनी एकमेकांच्या हातात हात घेत हम सब साथ है. अशा घोषणा दिल्यात. तसेच आढळराव पाटलांना आमचा पाठिंबा असून त्यांना खासदार म्हणून लोकसभेत पाठवायचं आहे. अन् ४०० पारमध्ये मोदींसाठी एक आपला खासदार द्यायचा अशी शपथ यावेळी घेण्यात आली.
READ ALSO :
हेही वाचा..“पाच वर्षानंतर आताच माझी आठवण झाली का ?” माजी खासदाराचा भाजपला घरचा आहेर
हेही वाचा…Live Ajit Pawar | अर्चना पाटलांच्या प्रचारासाठी अजित पवार धाराशिवमध्ये, लाईव्ह सभा
हेही वाचा…कॉंग्रेसने कायम प्रभू श्रीरामाला विरोध केलाय. मोहोळांचा घणाघात
हेही वाचा…धाराशिव मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलली, कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचा भाजपात प्रवेश