पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी सकाळीच सुरूवात झाली आहे.तर देशातील २१ राज्यांतील १०२ मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. तामिळनाडूतील सर्व म्हणजे ३९ लोकसभा मतदारसंघात पहिल्याच टप्प्यात मतदान होत आङए. देशातील कोट्यावधी मतदार मतदानाचा हक्क आज बजावणार आहेत. महाराष्ट्रात एकूण पाच लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
नागपुर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार नितीन गडकरी विजयाची हॅट्रिक साधण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांच्याविरोधात कॉंग्रेसने विकास ठाकरे यांचं मोठं आवाहन असणार आहे. तर एकूण २२,१९,२४४ मतदार २६ उमेदवाराचं भवितव्य मतदान पेटीत टाकणार आहे. तर गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून नामदेव किरसान यांच्याविरोधात महायुतीचे उमेदवार अशोक नेते उभे टाकले आहेत. या मतदारसंघात एकूण १० उमेदवार असून १६,१३,०९६ मतदार आहेत.
हेही वाचा..माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांना मोठा धक्का, अनिकेत देशमुखांनी अपक्ष अर्ज भरला ?
तर चंद्रपुर मतदारसंघात एकूण १५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले असून १८,३६,३१४ मतदार मतदान करणार आहेत. याठिकाणी मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि कॉंग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांच्यात प्रमुख लढत होत आहेत. तर रामटेक मतदारसंघात तिरंगी लढत होत असून यामध्ये राजु पारवे, श्यामकुमार बर्वे आणि वंचितकडून किशोर गजभिये निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. याठिकाणी एकूण २८ उमेदवार असून २०,४६,४३५ मतदार मतदान करणार आहेत.
तर गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघात सुनील मेंढे यांच्याविरोधात प्रशांत पडोळे आणि संजय कुंभलकर यांच्यात सामना होणार आहे. याठिकाणी एकून १८ उमेदवार असून एकूण १८,२०,५३१ मतदार मतदान करणार आहेत.
या लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह कॉंग्रेसचे राहुल गांधी यांची सभा पार पडली. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील यावेळी सभा घेतली. यातच राज्यातील प्रमुख नेत्यांच्याही सभा या मतदारसंघात झाल्याचे दिसून आलं.
READ ALSO :
हेही वाचा…मोहोळांच्या प्रचारात मनसे सक्रीय ; भाजपा मनसे पदाधिकाऱ्यांची प्रचार नियोजन बैठक संपन्न
हेही वाचा…“मशीनमध्ये कचाकच बटन दाबा’, विरोधकांची टिका, अजितदादांनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…
हेही वाचा…“बारामतीला लीड मिळणार की नाही, ते बारामतीकर सांगतील”, अजितदादांनी लोकसभेसाठी ठोकला शड्डू
हेही वाचा..” ही माझी शेवटची निवडणूक आहे”, मतदारांना आढळरावांनी घातली भावनिक साद