सोलापुर : सोलापुर लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी मोठं शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवार अर्ज सादर करत आहेत. त्यांच्यासमोर भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचं मोठं आवाहन असणार आहे. त्यापुर्वी उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या आधी प्रणिती शिंदे यांची मोठी सभा सोलापुरात पार पडली. यावेळी प्रणिती शिंदे यांनी भाजपवर कडाडून टिका केली. त्यानंतर आयोजित केलेल्या रॅलीला देखील लोकांचा मोठा प्रतिसाद बघायला मिळाला.
यावेळी प्रणिती शिंदे म्हणाल्या की, मागील दहा वर्ष आपण सोलापुर भाजपच्या ताब्यात दिलं होतं. परंतु भाजपला याठिकाणी काहीही विकास करता आलेला नाही. आता वेळ आली आहे. कॉंग्रेस शेवटच्या श्वासापर्यंत तुमचा विचार करीत आहे आणि करणार आहे. त्यामुळे तुम्हीच ही निवडणुक हाती घ्या आणि भाजपला याठिकाणांहून हद्दपार करा. असे आवाहनही प्रणिती शिंदे यांनी उपस्थितीत लोकांना केले.
माझ्या शेतकरी बांधवाच्या जीवावर भाजपने मतदान घेतलं. त्याच शेतकऱ्याचा आत्मा भाजप पक्ष जाळत आहे. याचा निषेध करते. मागील दहा वर्षात भाजपने आमच्या सोलापुरकरांची मतं घेतली. अन् सत्तेची फक्त मजा घेतली. ज्यांना गरज होती. त्यावेळी तुम्ही त्यांच्या पाठी फिरवली. अजूनही भाजपच्या उमेदवारांच्या पाठीमागे दोन खासदार फिरत नाहीत ? तुम्हाला लाज वाटते आहे का ? असा सवाल करत माझ्या पाठीमागे तर खासदार आहे. माझा बाप खासदार होता. तो माझ्या पाठीशी उभा आहे. असा हल्लाबोलही प्रणिती शिंदे यांनी केला.
READ ALSO :
हेही वाचा..अजित पवारांसह सुनेत्रा पवार दगडुशेठच्या चरणी लीन
हेही वाचा…Live Ajit Pawar | सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ महायुतीची पुण्यात सभा, लाईव्ह