बारामती : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आता चांगलीच रंगत येताना दिसत आहे. बारामतीत होऊ घातलेल्या सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवा लढतीकडे देशाचे लक्ष लागले आहे. यातच गेल्या दहा वर्षापासून बारामतीच्या खासदारासाठी मीच मत मागायला येत होतो. मात्र गेल्या दहा वर्षात खासदार निधीतून एकही काम बारामतीत झालेलं नाही. सतत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत बसाल तर विकास काम कसा होणार ? असा सवाल करत पाहिजे तेवढा निधी देतो, तुम्ही पण कचा-कचा-कचा बटणं दाबा. म्हणजे मला निधी देताना बरं वाटेल. नाहीतर माझा हात आखडता येईल असेही अजित पवारांनी म्हटलं. त्यावर आता शरद पवार गटाकडून टिका करण्यात आलीय.
हेही वाचा…बारामतीत सुनेत्रा पवारांच्या विरोधात शरद पवारांनी अर्ज भरला ? बारामतीत मोठा ट्विस्ट
अजित दादांच्या वक्तव्यावर शरद पवार गटातील प्रवक्ते रविकांत वरपे यांनी एक ट्विट करत निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, एक वेळ होती. त्यावेळी संविधानाला मानणारे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा विरोधी लोकांना पण निधी देत होते. का तर लोकशाही नुसार ते निवडून आले आहेत. आज अजित दादा यांचे हे वक्तव्य ऐकल्या नंतर एक मराठी ‘म्हण’ आठवली ‘ ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या वाण नाही पण गुण मात्र लागला’ .भाजपचे लोक जी गोष्ट बोलत होते ते अजित दादा बोलू लागले आहेत. अजित दादा यांना त्यांचा पराभव दिसत आहे म्हणून ते असे बोलत आहेत हे मात्र नक्की.
हेही वाचा..“पुढील पाच वर्षांचा रोडमॅपही तयार “, माणगावच्या सभेत तटकरे काय काय म्हणाले ?
दरम्यान, मी तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, मी राज्याचा अर्थमंत्री आहे, उपमुख्यमंत्री आहे. आम्ही महायुतीत सरकार चालवत आहोत. मी राज्यासाठी अनेक गोष्टी केल्या. मी आताही सरकारमध्ये गेलो ते कामासाठीच गेलो. मी सत्तेला हपापलेला माणूस नाही. मी अनेक वर्षे अनेक पदांवर होतो. मी पाच ते सहा वेळेला उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं आहे. माझा रेकॉर्ड कोणी तोडेल असं मला वाटत नाही. सहा वेळा उपमुख्यमंत्री व्हायला तेवढ्या वेळेला निवडूनही यायला पाहिजे. अलीकडे आम्ही काम नाही केलं की लोक पार्सल बाजूला करतात. ही निवडणूक देशाचं भवितव्य घडवणारी निवडणूक आहे. असेही अजित पवारांनी म्हटलं होतं.
एक वेळ होती त्यावेळी संविधानाला मानणारे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा विरोधी लोकांना पण निधी देत होते. का तर लोकशाही नुसार ते निवडून आले आहेत.
आज अजित दादा यांचे हे वक्तव्य ऐकल्या नंतर एक मराठी ‘म्हण’ आठवली
‘ ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या वाण नाही पण गुण मात्र लागला’ .भाजपचे लोक… pic.twitter.com/7SGTOurjk5— Ravikant Varpe रविकांत वरपे (@ravikantvarpe) April 17, 2024
READ ALSO :
हेही वाचा….“अमोल कोल्हे राजकारणातील दुसरे संजय राऊत”, आढळरावांनी कोल्हेंना डिवचलं