पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार उद्या उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत. सकाळी दहा वाजता शांताई हॉटेल रास्ता पेठ येथे एकत्र येत बारामती लोकसभा मतदारसंघाच्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे, पुणे लोकसभेचे कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर , शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कोल्हे आपल्या प्रमुख नेत्यांसोबत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाणार आहेत.
हेही वाचा..“पुढील पाच वर्षांचा रोडमॅपही तयार “, माणगावच्या सभेत तटकरे काय काय म्हणाले ?
यावेळी शरद पवार, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, संग्राम थोपटे, संजय जगताप, संजय राऊत, संजय अहिर आणि सर्व पक्षीय आप, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आजी-माजी आमदार खासदार उपस्थित असणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्यानंतर महाविकास आघाडीची पहिली प्रचार सभा आयोजित करण्यात आलीय . यावेळी मोठ्याप्रमाणात शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे.
दुसऱ्या बाजूला अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा देखील १८ एप्रिललाच म्हणजेच उद्या अर्ज दाखल करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने उमेदवारी जाहीर केल्यानंतर सुनेत्रा पवार नामनिर्देश पत्र विकत घेतलं आहे. उद्या सुनेत्रा पवार निवडणूक अर्ज दाखल करणार आहे. यावेळी अजित पवार यांच्यासह देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सुनेत्रा पवार देखील मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची शक्यता आहे.
READ ALSO :
हेही वाचा….“अमोल कोल्हे राजकारणातील दुसरे संजय राऊत”, आढळरावांनी कोल्हेंना डिवचलं
हेही वाचा…बारामतीत सुनेत्रा पवारांच्या विरोधात शरद पवारांनी अर्ज भरला ? बारामतीत मोठा ट्विस्ट