नाशिक : महायुतीत नाशिक मतदारसंघाचा तिढा अद्यापही सुटलेला नाहीय. अशातच महायुतीकडून लोकसभेची निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले मंत्री छगन भुजबळ आणि विद्यमान खासदार हेमंत गोडसे काळाराम मंदिरात दर्शनासाठी आले असता त्यांची भेट झाली. यावेळी हेमंत गोडसे यांनी भुजबळांचे पाया पडून आशीर्वाद घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राम नवमीनिमित्त काळाराम मंदिरात दर्शन घेऊन हेमंत गोडसे जात होते. त्याच वेळी छगन भुजबळही दर्शनासाठी आले. त्यावेळी दोघांची भेट झाली. यादरम्यान हेमंत गोडसे यांनी भुजबळांचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतले. त्यानंतर भुजबळांनी महायुतीच्या नेत्यांना नाशिकच्या उमेदवारीचा तिढा 20 मे म्हणजे मतदानाच्या दिवसापर्यंत सोडवण्याचा उपरोधिक टोला हाणला. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
हेही वाचा…“जन्माने मी गवळी समाजाचा असलो तरी…”सुनील तटकरेंचं मोठं विधान
भुजबळांचे आशीर्वाद घेतल्यानंतर हेमंत गोडसे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, मराठी संस्कृतीमध्ये ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतात. त्यामुळे रामाचे दर्शन झाल्यानंतर भुजबळांची भेट होताच मी त्यांचे आशीर्वाद घेतले. हे आशीर्वाद नक्की कशासाठी घेतले, हे प्रभू रामचंद्रांना माहिती आहे. असं गोडसे म्हणालेत. तसचे आपल्याला उमेदवारीची संधी लवकर प्राप्त होवो आणि विजय पण मिळो ही आज काळारामाकडे प्रार्थना केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच एक दोन दिवसात नाशिकचा निर्णय होईल. १० वर्षे मी खासदार राहिलोय, नाशिकला पुन्हा धनुष्यबाण येईल. असेही त्यांनी म्हटलं.
READ ALSO :
हेही वाचा….“अमोल कोल्हे राजकारणातील दुसरे संजय राऊत”, आढळरावांनी कोल्हेंना डिवचलं
हेही वाचा…बारामतीत सुनेत्रा पवारांच्या विरोधात शरद पवारांनी अर्ज भरला ? बारामतीत मोठा ट्विस्ट
हेही वाचा..“पुढील पाच वर्षांचा रोडमॅपही तयार “, माणगावच्या सभेत तटकरे काय काय म्हणाले ?