रायगड : नैराश्यातून कसे शब्द बाहेर पडतात हे आता अनंत गीते यांच्या मुखातून जनतेला ऐकायला मिळत आहेत. आपल्यावर कोरोनाची महामारी आली. त्यावेळी हेच अनंत गीते कुठे होते ? असा संतप्त सवाल करतानाच संकटाच्या काळात संवेदना असाव्या लागतात. मानवता वादातून प्रत्येकाकडे बघायचे असते. मात्र हेच अनंत गीते विसरले, अशी टीका महायुतीचे रायगडचे उमेदवार सुनील तटकरे यांनी केली. माणगाव खरवली येथे महायुतीचा कार्यकर्ता मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना तटकरे बोलत होते.
हेही वाचा…“जनतेच्या प्रेमाची कळवळ म्हणून मी राजकारणात”, आढळराव पाटलांनी व्यक्त केल्या भावना
पुढे बोलताना तटकरे म्हणाले, जन्माने मी गवळी समाजाचा असलो तरी नशीबाने मी कुणबी बांधवांचा आहे याचा मला अभिमान आहे. काबाडकष्ट करणार्या लोकांच्या पाठीमागे भक्कमपणे महायुतीचे सरकार उभे राहिले आणि यापुढेही राहील. असेही ते म्हणाले. या तालुक्यासह जिथे दूरध्वनीची समस्या भेडसावत आहे अशा सर्व खेड्यापाड्यात येत्या सहा महिन्यात खासदार फंडातून ४ जीचे नेटवर्क उभे केल्याशिवाय थांबणार नाही. या भागातील तरुण वर्ग शेतीकडे वळला पाहिजे. या गावात कलिंगडाची शेती मोठया प्रमाणात होते यावर येत्या कालावधीत नक्कीच काम केले जाईल, असा शब्द तटकरे यांनी यावेळी दिला.
हेही वाचा..अन् पुण्याच्या व्हिजनवर धंगेकरांनी वेळ मारून नेली ! पुण्यातील ‘ती’ पत्रकार परिषद चर्चेत
दरम्यान, माझ्या मतदारसंघातील खेड्यापाड्यातील सगळ्या गावांची नावे सांगतो. मात्र अनंत गीते यांनी खेड्याचे नको तालुक्यातील एका गावाचे नाव सांगितले तरी ते या मतदारसंघात काम करत होते हे मान्य करेन. असं आव्हानच तटकरे यांनी अनंत गिते यांना दिले. तर माणगाव तालुक्यात कुणबी समाजासाठी भवन करण्याचा प्रयत्न केला त्यात माझा खारीचा वाटा आहे हेही तटकरे यांनी आवर्जून सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा…“ज्यांना खासदाराचं काय काम असतं हे माहीत नाही, ते आम्हाला विचारतात ४० वर्षात काय केलं?”
हेही वाचा..राज्यात 2024 साली कोण खासदार होणार ? सर्व्हेत लोकसभेच्या 48 जागांचा सनसनाटी निकाल जाहीर
हेही वाचा…दिवंगत बापटांबद्दल धंगेकरांची टिका, मुरलीधर मोहोळ संतापले, म्हणाले…
हेही वाचा…“४ दिवस सासूचे संपले, आता सुनेचे ४ दिवस येऊ द्या”, अजित पवारांचा खणखणीत टोला
हेही वाचा…तुम्ही 18 जागा जिंकल्या तर मी राजकारण सोडेन”, ठाकरेंना कुणी दिलं खुल आव्हान ?