मुंबई : राज्यात झालेले पक्ष फुट, केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर, हिंसाचार इत्यादी घडामोडी लक्षात घेऊन लोकसभा निवडणुकांकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान हे १९ एप्रिलला होत असून उर्रवित चार टप्प्यात लवकरच होणार आहे. त्याची मतमोजणी ही ०४ जुनला होणार असून त्याच दिवशी निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच लोकसभा निवडणुकीपुर्वी एबीपी माझा- सी व्होटरने केलेला ओपिनियन पोल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघापैकी सनसनाटी निकाल समोर आला आहे.
हेही वाचा…“अमित शाहांच्या पुत्र प्रेमामुळे भारत अंतिम सामना हरला”, ठाकरेंकडून जोरदार पलटवार
राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी एका बाजूला महायुती तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी आमनेसामने उभी राहिली आहे. महायुतीत शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी तर महाविकास आघाडीत शरद पवारांची राष्ट्रवादी, ठाकरेंची शिवसेना आणि कॉंग्रेस अशी प्रमुख राजकीय पक्ष रिंगणात आहेत. राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात काही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी तर काही ठिकाणी दोन्ही शिवसेना आमनेसामने आली आहेत. तर काही ठिकाणी कॉंग्रेस आणि भाजप एकमेकांसमोर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
यातच एबीपी माझा ने जाहीर केलेल्या ओपिनियन पोलमध्ये धक्कादायक निकाल हाती लागला आहे. यामध्ये महाविकास आघाडीला १८ तर महायुतीला ३० जागांवर विजय मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये नंदुरबार लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे गोवाल पाडवी हे भाजपच्या हिना गावित यांच्यावर भारी पडतांना दिसत आहे. तर धुळ्यात विद्यमान खासदार सुभाष भामरे, तर जळगावात स्मिता वाघ या करण पवार यांच्यावर विजय मिळवण्याची शक्यता आहे.
एबीपी माझा- सी व्होटरच्या ओपिनियन पोलमध्ये राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघामध्ये कोणता उमेदवार आघाडीवर कोण पिछाडीवर याचा निष्कर्ष
मतदारसंघ महायुती (भाजप, शिंदे आणि अजित) महाविकास आघाडी (UBT, Shard, Cong) ओपिनियन पोलनुसार कोण आघाडीवर
नंदुरबार :- डॉ. हिना गावित – गोवाल पाडवी (आघाडीवर )
धुळे :- सुभाष भामरे (आघाडीवर ) डॉ. शोभा बच्छाव
जळगाव :- स्मिता वाघ (आघाडीवर ) करण पवार
रावेर :- रक्षा खडसे (आघाडीवर ) श्रीराम पाटील
बुलडाणा :- प्रतापराव जाधव नरेंद्र खेडेकर (आघाडीवर )
अकोला :- अनुप धोत्रे (आघाडीवर ) अभय पाटील
अमरावती :- नवनीत राणा (आघाडीवर ) बळवंत वानखेडे
वर्धा :- रामदास तडस (आघाडीवर ) अमर काळे
रामटेक:- राजू पारवे (आघाडीवर ) रश्मी बर्वे
नागपूर :- नितीन गडकरी (आघाडीवर ) विकास ठाकरे
भंडारा-गोंदिया :- सुनील मेंढे (आघाडीवर ) डॉ. प्रशांत पडोळे
गडचिरोली-चिमूर :- अशोक नेते डॉ. नामदेव किरसान डॉ. नामदेव किरसान
चंद्रपूर :- सुधीर मुनगंटीवार (आघाडीवर ) प्रतिभा धानोरकर
यवतमाळ – वाशिम :- राजश्री पाटील संजय देशमुख (आघाडीवर )
हिंगोली :- बाबूराव कदम नागेश पाटील आष्टीकर (आघाडीवर )
नांदेड :- प्रताप पाटील चिखलीकर वसंतराव बळवंतराव चव्हाण (आघाडीवर )
परभणी :- महादेव जानकर संजय जाधव (आघाडीवर )
जालना :- रावसाहेब दानवे (आघाडीवर ) कल्याण काळे
औरंगाबाद :- चंद्रकांत खैरे (आघाडीवर )
दिंडोरी :- डॉ. भारती पवार(आघाडीवर ) भास्करराव भगरे
नाशिक :- राजाभाई वाजे महायुती (आघाडीवर )
पालघर :- भारती कामडी , महायुती (आघाडीवर )
भिवंडी :- कपिल पाटील, सुरेश म्हात्रे (आघाडीवर )
कल्याण :- श्रीकांत शिंदे (आघाडीवर ) वैशाली दरेकर
ठाणे :- राजन विचारे, महायुती (आघाडीवर )
मुंबई-उत्तर :- पियुष गोयल (आघाडीवर ) काँग्रेस
मुंबई – उत्तर पश्चिम :- अमोल कीर्तीकर महायुती (आघाडीवर )
मुंबई ईशान्य (उत्तर पूर्व) :- मिहीर कोटेचा (आघाडीवर ) संजय दिना पाटील
मुंबई उत्तर मध्य :- काँग्रेस , महायुती (आघाडीवर )
मुंबई दक्षिण मध्य :- राहुल शेवाळे (आघाडीवर ) अनिल देसाई
दक्षिण मुंबई :- अरविंद सावंत महायुती (आघाडीवर )
रायगड :- सुनील तटकरे अनंत गीते (आघाडीवर )
मावळ :- श्रीरंग बारणे (आघाडीवर ) संजोग वाघेरे-पाटील
पुणे :- मुरलीधर मोहोळ (आघाडीवर ) रविंद्र धंगेकर
बारामती :- सुनेत्रा पवार सुप्रिया सुळे (आघाडीवर )
शिरुर :- शिवाजी आढळराव डॉ. अमोल कोल्हे (आघाडीवर )
अहमदनगर :- सुजय विखे पाटील निलेश लंके (आघाडीवर )
शिर्डी :- सदााशिव लोखंडे भाऊसाहेब वाघचौरे (आघाडीवर )
बीड :- पंकजा मुंडे (आघाडीवर ) बजरंग सोनवणे
धाराशिव :- अर्चना पाटील ओमराजे निंबाळकर (आघाडीवर )
लातूर :- सुधाकर श्रृंगारे (आघाडीवर ) शिवाजीराव काळगे
सोलापूर :- राम सातपुते (आघाडीवर ) प्रणिती शिंदे
माढा :- रणजितसिंह नाईक निंबाळकर धैर्यशील मोहिते पाटील (आघाडीवर )
सांगली :- संजयकाका पाटील (आघाडीवर ) चंद्रहार पाटील
सातारा :- उदयनराजे भोसले शशिकांत शिंदे (आघाडीवर )
रत्नागिरी-सिंधुदुर्ग :- नारायण राणे (आघाडीवर ) विनायक राऊत
कोल्हापूर :- संजय मंडलिक (आघाडीवर ) शाहू महाराज छत्रपती
हातकणंगले :- धैर्यशील माने सत्यजीत पाटील (आघाडीवर )
READ ALSO :
हेही वाचा…दिवंगत बापटांबद्दल धंगेकरांची टिका, मुरलीधर मोहोळ संतापले, म्हणाले…
हेही वाचा…“४ दिवस सासूचे संपले, आता सुनेचे ४ दिवस येऊ द्या”, अजित पवारांचा खणखणीत टोला
हेही वाचा…तुम्ही 18 जागा जिंकल्या तर मी राजकारण सोडेन”, ठाकरेंना कुणी दिलं खुल आव्हान ?
हेही वाचा…“जनतेच्या प्रेमाची कळवळ म्हणून मी राजकारणात”, आढळराव पाटलांनी व्यक्त केल्या भावना*
हेही वाचा..अन् पुण्याच्या व्हिजनवर धंगेकरांनी वेळ मारून नेली ! पुण्यातील ‘ती’ पत्रकार परिषद चर्चेत