पुणे : राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर पवार घराण्यात पाहिजे तितका संघर्ष दिसून आला नाही. परंतु लोकसभेची निवडणुक लागल्यानंतर दोन्ही पवारांमध्ये शाब्दिक चकमकी सुरू झाल्या आहेत. अजित पवारांकडून टिप्पणी केली जाते. त्यावर शरद पवारांकडून प्रत्युत्तर दिलं जातंय. असे गेल्या काही दिवसापासून बारामती लोकसभा मतदारसंघात सुरू आहे. अशातच आता अजित पवारांनी शरद पवारांना खणखणीत टोला लगावला आहे.
हेही वाचा…नाशिकच्या जागेबाबत महायुतीत वाढला आणखी संभ्रम, महायुतीत भांडणं होण्याची शक्यता
“४ दिवस सासूचे संपले, आता सुनेचे ४ दिवस येऊ द्या. ४० वर्ष झाली तरी बाहेरचे म्हणत आहेत”, असा सणसणीत टोला अजित पवारांनी शरद पवारांना लगावला आहे. अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शरद पवारांन प्रत्युत्तर दिलं आहे.
“ही वडीलधारी जरा, जुना काळ आठवत असेल, तर त्यांना म्हणा, जुना काळ आता थोडा बाजूला ठेवा. आता नवीन काळ बघा. आता सासूचे चार दिवस संपले, आता सूनेचे चार दिवस येऊद्या, असं सांगाना. की फक्त सासू-सासू-सासू, मग सुनेनं फक्त बघत बसायचं? बाहेरची-बाहेरची-बाहेरची, असं कुठं असतं का राव? असतं का? आपण घरची लक्ष्मी म्हणून त्यांच्याकडे बघतो. ४० वर्षे झाली तरी बाहेरची? किती वर्ष झाले मग घरची? सांगा आई बहिणीनों, बघा बाबा आता” असं अजित पवार म्हणाले आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…तुम्ही 18 जागा जिंकल्या तर मी राजकारण सोडेन”, ठाकरेंना कुणी दिलं खुल आव्हान ?
हेही वाचा…“जनतेच्या प्रेमाची कळवळ म्हणून मी राजकारणात”, आढळराव पाटलांनी व्यक्त केल्या भावना*
हेही वाचा..अन् पुण्याच्या व्हिजनवर धंगेकरांनी वेळ मारून नेली ! पुण्यातील ‘ती’ पत्रकार परिषद चर्चेत
हेही वाचा…“अमित शाहांच्या पुत्र प्रेमामुळे भारत अंतिम सामना हरला”, ठाकरेंकडून जोरदार पलटवार