मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाची तारीख जवळ येऊ लागली आहे. तशी तशी राजकीय नेत्यांच्या प्रचाराची धार वाढत चालली आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भंडाऱ्यात जाहीर सभा पार पडली. या सभेतून अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार घणाघात केला. उद्धव ठाकरे आपल्या पुत्रप्रेमाने आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुत्रीप्रेमाने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष फुटला अशी टिका अमित शाह यांनी केली. त्यावर आता ठाकरेंकडून पलटवार करण्यात आलाय.
हेही वाचा…“..तर काकींचा अर्ज मागे घेऊन बारामतीत अजितदादा निवडणूक लढतील”, रोहित पवारांचा मोठा दावा
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना सांगायचं तुमच्या पुत्र प्रेमामुळे भारत अंतिम सामना हरलेला आहे. त्यामुळे पत्र प्रेम दाखवत नाही. त्यांच्या पक्षात दुसरा अध्यक्ष आहे. अमित शाह यांचं पक्षातील नेमंक स्थान काय आहे ? त्यांचा अध्यक्ष दुसरा आहे. पण अमित शाह यांना सांगायचं. तुम्ही या गोष्टी बोलता तेव्हा तुमच्या आणि तुमच्या चेल्याचपाट्यात एक वाक्यता असू द्या. फडणवीस म्हणाले होते. मी पुन्हा येईन. ते दोन पक्ष फोडून पुन्हा आले. त्यामुळे तुमची लाज तुमचे चेले चपाटे काढत आहेत. असा हल्लाबोलही त्यांनी केलाय.
हेही वाचा..भाजपच्या आमदारांची धाकधुक वाढली, वरिष्ठ नेत्यांकडून आमदारांना कडक आदेश
दरम्यान, पुढे बोलतांना ते म्हणाले की, काही ठिकाणी कॉंग्रेसचे उमेदवार जाहीर व्हायचे बाकी आहे. दोन दिवसात होतील. आम्ही राज्यासाठी वचननामा वेगळा द्यायचा का यावर विचार करत आहोत. त्यानंतर सभांबाबत चर्चा होणार असल्याचे ठाकरेंनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…नाशिकच्या जागेबाबत महायुतीत वाढला आणखी संभ्रम, महायुतीत भांडणं होण्याची शक्यता
हेही वाचा…आढळरावांच्या कोपरासभांना शिरूरमध्ये मोठा प्रतिसाद मतदारांना दिलं ‘हे’ आश्वासन