पुणे : राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर बारामतीत पवार विरूद्ध पवार अशी पहिल्यांदाच निवडणूक होत सुनेत्रा पवार पहिल्यांदाच लोकसभेची निवडणुक लढवत आहेत. यातच पुणे जिल्ह्यातील महायुतीचे मुरलीधर मोहोळ, सुनेत्रा पवार आणि शिरूर लोकसभेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील एकाच दिवशी उमेदवारी अर्ज भरणार आहे. त्यासाठी आता उमेदवारांनी आपला आपला उमेदवारी जिल्हाधिकारी कार्यालयातून अर्ज विकत घेतला आहे. मात्र बारामती लोकसभा मतदारसंघातून आता सुनेत्रा पवार यांच्यासह अजित पवारांसाठीही डमी अर्ज घेतला असल्याची माहिती समोर येत आहे. त्यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांना डिवचण्याचा प्रयत्न केलाय.
रोहित पवार म्हणाले की, दिल्लीवरून आदेश आले असतील तर दादा काहीपण करतील. आधी शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना अजितदादा हे स्वत: आदेश द्यायचे. आज त्यांना दिल्लीचा आदेश ऐकावा लागतोय. अजित दादांनी उमेदवारी अर्ज भरला आणि दिल्लीवरून आदेश आला की, तुमचा अर्ज कायम ठेवा आणि काकींचा अर्ज मागे घ्या. तर अजितदादांना ते मनाविरूद्ध असलं तरी ऐकावं लागेल. त्यामुळे ते त्याबाबतीत काय करतील हे येणाऱ्या काळात पाहावं लागेल, असा टोलाही रोहित पवारांनी लगावला.
हेही वाचा..सांगलीत कॉंग्रेसमध्ये बंडाळी, विशाल पाटलांनी उमेदवारी अर्ज भरला, दिला ‘हा’ इशारा
दरम्यान, राष्ट्रवादी पक्षात मोठी फुट पडल्यानंतर बारामतीच्या लढतीकडे आता सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून बारामती लोकसभेचा गड हा पवारांच्या ताब्यात राहिला आहे. भाजपने याठिकाणी जिंकण्याचा खुप प्रयत्न केला. मात्र गेल्या काही निवडणुकांमध्ये भाजपला याठिकाणी यश आलं नाही. यातच राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर आता महायुतीकडून सुनेत्रा पवारांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार विजयी झालेत. तर ती जागा आपोआपच एनडीएकडे येणार आहे. त्यामुळे सध्या अजित पवारांसह महायुतीकडून जोरदार प्रयत्न करतांना दिसत आहेत.
READ ALSO :
हेही वाचा..भाजपच्या आमदारांची धाकधुक वाढली, वरिष्ठ नेत्यांकडून आमदारांना कडक आदेश
हेही वाचा…सातारा लोकसभेसाठी उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर, शशिकांत शिंदेंसोबत होणार मोठा सामना
हेही वाचा…लाखो महिलांना आत्मनिर्भरतेचे ‘वाण’ देणाऱ्या अर्चना पाटील