साेलापूर : भाजपचे साेलापूरचे उमेदवार राम सातपुते आणि माढ्याचे रणजितसिंह निंबाळकर मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. भाजपने शहरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली रॅलीचे आयाेजन केले आहे. भाजप साेडून राष्ट्रवादी पवार गटात गेलेले माढ्याचे उमेदवार धैर्यशील माेहिते-पाटील हे सुध्दा मंगळवारीच अर्ज दाखल करणार आहेत. यानिमित्ताने शहरातील सात रस्ता परिरसातील भाजप आणि माेहिते-पाटील समर्थक दुपारी एक वाजण्याच्या सुमाराला आमने-सामने येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…गावाच्या वेशीवरच लागलेत कोल्हेंच्या विरोधात बॅनर, शिरूर मतदारसंघात नेमकं घडतंय तरी काय ?
भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे म्हणाले की , भाजपच्या रॅलीला सकाळी ११ वाजता छत्रपती संभाजी महाराज चाैकापासून सुरुवात हाेईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकाळी ११.३० च्या सुमाराला या रॅलीमध्ये सहभागी हाेतील. छत्रपती शिवाजी महाराज चाैक ते सात रस्ता या मार्गावर रॅली निघेल. सात रस्ता येथे रॅलीचा समाराेप हाेईल आणि येथेच जाहीर सभा हाेईल. यानंतर दाेन्ही उमेदवार दुपारी एक वाजण्याच्या सुमाराला जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करतील.
हेही वाचा…“इतका सच्चा, तत्वनिष्ठ, सज्जन, साधा, भोळा…” मनसेचं उद्धव ठाकरेंना खोचक पत्र
पवार गटाचे प्रदेश निरीक्षक शेखर माने म्हणाले, धैर्यशील माेहिते-पाटील दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल करणार आहेत. राष्ट्रवादीचे शेकडाे कार्यकर्ते यावेळी उपस्थित असतील. राष्ट्रवादीचे फलटण, माण तालुक्यातील कार्यकर्ते यावेळी उपस्थित राहणार आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…‘मुळ पवार विरूद्ध बाहेरचे पवार’ ,अखेर शरद पवारांनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…
हेही वाचा…लहुजी शक्ति सेनेचा भाजपा-महायुतीला बिनशर्त पाठिंबा
हेही वाचा…रायगडमध्ये होणार मोठा घोळ, तीन ‘अनंत गिते’ निवडणुकीच्या रिंगणात
हेही वाचा…“महायुतीचा आपल्या हक्काचा खासदार असेल तर..,”मल्हार पाटलांचं मोठं विधान