मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाकडून मनसेवर सातत्याने टिका केली जात आहे. सातत्याने भूमिका बदलणारे राज ठाकरे असा उल्लेख करत ठाकरे गटाकडून राज ठाकरेंवर निशाणा साधला जात आहे. यावरून आता मनसेचे नेते गजानन काळे यांनी उद्धव ठाकरे यांना खोचक टोला लगावत एक पत्र लिहिलंय.
गाजनन काळे यांनी उद्धव ठाकरे यांना लिहिलेलं पत्र जशाच्या तसं…
प्रति,
आमदार आदरणीय उद्धवजी ठाकरे,
शिल्लक सेना प्रमुख (उबाठा),
मुंबई.
विषय – कधीही आपल्या राजकीय भूमिकांमध्ये बदल न केल्याबद्दल आपला दुधाने अभिषेक करण्यास वेळ मिळणेबाबत … महोदय, सस्नेह जय महाराष्ट्र !!!
आमदार आदरणीय उद्धवजी ठाकरे आपण शिवसेनेची धुरा हातात घेतल्यापासून (माफ करा आत्ताचा आपला उबाठा गट) कधीही सेनेच्या भूमिकेला छेद देऊन राजकारण केलेले नाही. मंत्रीपद, सत्ता, मुख्यमंत्री पद (स्वतःला) यासाठी आपण कधी भाजपा बरोबर युती केली तर कधी युती तोडली. नंतर आपल्याला मुख्यमंत्री पद मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर आपण सेनेचे पारंपरिक शत्रू असलेले आणि संपूर्णतः विरोधी विचारधारा असलेल्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (म्हणजे आत्ताचा शरद पवार गट) बरोबर आघाडी केलीत.
हेही वाचा… मोदीजींची गॅरेंटी म्हणजे, गॅरेंटी पूर्ण होण्याची गॅरेंटी ! मुरलीधर मोहोळ
मात्र सेनेला मुख्यमंत्री पद मिळवून दिलेच. हा भाग वेगळा की आपण एका सर्वसामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार होतात पण माफ करा आम्ही विसरलोच की आपणही एक शिवसैनिकच आहात. हे सगळे आपण केलेत यास कुठेही यू टर्न, तडजोडीचे, सत्तापिपासू, स्वार्थी, मतलबी राजकारण अथवा भूमिका बदलणे असे म्हणता येत नाही. याबद्दल आपले करावे तितके कौतुक कमीच आहे…!!!
आपल्यासारखा इतका सच्चा, प्रामाणिक, तत्वनिष्ठ, सज्जन, साधा, भोळा आणि सत्तेचा अजिबात मोह नसलेला व्यक्ती आजच्या राजकारणातच काय तर या पृथ्वीतलावर सापडणे दुर्मिळ. याच आपल्या गुणांसाठी, तुमचे महाराष्ट्रावर असेलेले ऋण फेडण्यासाठी कृतज्ञता म्हणून आम्ही समस्त महाराष्ट्राच्यावतीने आपला दुधाने अभिषेक करू इच्छितो (जसा नायक सिनेमात अनिल कपूर यांचा केला गेला होता) तरी आपण आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना यासाठी आपली वेळ द्यावी, ही नम्र विनंती…!!!
आपला नम्र,
गजानन काळे,
महाराष्ट्र सैनिक
टीप – निवडणुकांच्या आपल्या व्यस्त दिनक्रमात आपण वेळ न देऊ शकल्यास आपल्या फोटोला आम्ही दुधाने अभिषेक घालून समस्त महाराष्ट्राची इच्छा पूर्ण करुच
दरम्यान, २०१९ सालानंतर राज्यात अनेक राजकीय उलथापालथी झाल्यात. राज्यात असलेले महाविकास आघाडीचं सरकार कोसळून महायुती सरकार सत्तेत आले. यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात मोठी बंड झालीत. तर त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या पुर्वी अनेक कॉंग्रेस नेत्यांनी भाजपसह इतर पक्षात प्रवेश केलीत. यातच आता राज ठाकरे यांनी महायुतीला लोकसभेसाठी पाठिंबा जाहीर केलाय.
प्रति,
आमदार आदरणीय उद्धवजी ठाकरे,
शिल्लक सेना प्रमुख (उबाठा),
मुंबई.विषय – कधीही आपल्या राजकीय भूमिकांमध्ये बदल न केल्याबद्दल आपला दुधाने अभिषेक करण्यास वेळ मिळणेबाबत …
महोदय,
सस्नेह जय महाराष्ट्र !!!आमदार आदरणीय उद्धवजी ठाकरे आपण शिवसेनेची धुरा हातात घेतल्यापासून (माफ… pic.twitter.com/G0h46vZAa4
— Gajanan Kale (@MeGajananKale) April 15, 2024
READ ALSO :
हेही वाचा…पुण्यात कॉंग्रेसमध्ये भडका, फडणवीसांसोबत चर्चा, आबा बागुल भाजपच्या वाटेवर ?
हेही वाचा…“ही निवडणुक भावकी, गावकीची नाही, “अजित पवार यांचं मोठं वक्तव्य
हेही वाचा…“ही निवडणुक भावकी, गावकीची नाही, “अजित पवार यांचं मोठं वक्तव्य
हेही वाचा. “श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून ५०० कोटी रुपये खाल्ले “, मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्रावर गंभीर आरोप