सांगली : कॉंग्रेसचे नेते विशाल पाटील यांना महाविकास आघाडीत बंडखोरी करत आज सांगली लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज सादर केला आहे. महाविकास आघाडीकडून याआधी ठाकरे गटाचे नेते चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र विशाल पाटील यांच्यासह कॉंग्रेसचे स्थानिक नेते नाराज आहेत. अशातच आता विशाल पाटील यांनी मोठं शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज सादर केला आहे. त्याआधी त्यांनी कॉंग्रेससह महाविकास आघाडीलाही मोठा इशारा दिलाय.
महायुतीकडून संजय काका यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे. तर या जागेसाठी सुरूवातीपासून विशाल पाटील कॉंग्रेसकडून इच्छूक होते. मात्र सांगलीची जागा महाविकास आघाडीत ठाकरे गटाकडे गेल्याने विशाल पाटील समर्थक नाराज झालेत. तरीही आज पाटलांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. यातच येत्या १९ तारखेपर्यंत एबी फॉर्म दिला नाही तर कॉंग्रेसमध्ये बंडखोरी करणार असा इशाराही विशाल पाटील यांनी दिलाय.
दरम्यान, शिवाजी महाराजांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शत्रुशी दोन हात करून स्वराज्य निर्माण केलं. अखंड प्रेरणेचा स्त्रोत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांमुळेच लढण्याच बळ मिळतं. तसेच समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वासाठी आपलं संपूर्ण आयुष्य पणाला लावणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासमोर नतमस्तक होत. बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानामुळे सर्वसामान्यांना हक्क मिळाले. परंतु, आता त्याच संविधानाला धोका निर्माण झाला आहे. संविधान वाचविण्याच्या लढाईला सज्ज होण्याआधी संविधान निर्माते बाबासाहेबांना अभिवादन करून विशाल पाटलांनी निवडणुक निर्णय अधिकारी यांच्याकडे फॉर्म दिला.
READ ALSO :
हेही वाचा…हेही वाचा… भाजपच्या आमदारांची धाकधुक वाढली, वरिष्ठ नेत्यांकडून आमदारांना कडक आदेश
हेही वाचा…सातारा लोकसभेसाठी उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर, शशिकांत शिंदेंसोबत होणार मोठा सामना
हेही वाचा…लाखो महिलांना आत्मनिर्भरतेचे ‘वाण’ देणाऱ्या अर्चना पाटील