सातारा : महायुतीकडून सातारा लोकसभा मतदारसंघातून कुणाला उमेदवारी देण्यात येणार ? अशी प्रतिक्षा सगळ्यांना लागून राहिली होती. अखेर आज भाजपकडून उदयन राजे भोसले यांना सातारा लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या या जागेचा तिढा अखेर सुटला आहे. आता उदयन राजे भोसले यांचा सामना महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्याशी होणार आहे.
हेही वाचा…‘मुळ पवार विरूद्ध बाहेरचे पवार’ ,अखेर शरद पवारांनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…
महायुतीत सातारा लोकसभेचा मोठा तिढा निर्माण झाला होता. सातारा लोकसभा मतदारसंघ हा अजित पवार गटाकडे होता. मात्र याठिकाणी भाजपने दावा सांगितला होता. यातच सातारा भाजपला सोडण्यास तयार आहे. मात्र साताऱ्याच्या बदल्यात अजित पवार गटाला नाशिकची जागा हवी होती. पण नाशिकची जागा शिंदे गट सोडायला तयार नव्हते. त्यामुळे मोठा पेच निर्माण झाला होता. अखेर साताऱ्याची जागा भाजपला सुटली असून याठिकाणी उदयन राजे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
हेही वाचा…लहुजी शक्ति सेनेचा भाजपा-महायुतीला बिनशर्त पाठिंबा
दरम्यान, राज्यातील तसेच देशातील इतर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार घोषीत होत होते. मात्र उदयन राजे भोसले यांची उमेदवारी घोषीत होत नव्हती. याच पार्श्वभूमीवर उदयन राजे भोसले यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. तसेच राज्यातील प्रमुख नेत्यांशी सातत्याने राजे संपर्कात होते. यानंतर आता त्यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…लाखो महिलांना आत्मनिर्भरतेचे ‘वाण’ देणाऱ्या अर्चना पाटील
हेही वाचा…*लाखो महिलांना आत्मनिर्भरतेचे ‘वाण’ देणाऱ्या अर्चना पाटील*