बारामती : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आता चांगलीच रंगत येताना दिसत आहे. बारामतीत होऊ घातलेल्या सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवा लढतीकडे देशाचे लक्ष लागले आहे. यातच गेल्या दहा वर्षापासून बारामतीच्या खासदारासाठी मीच मतं मागायला येत होतो. मात्र गेल्या दहा वर्षात खासदार निधीतून एकही काम बारामतीत झालेलं नाही. सतत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत बसाल तर विकास काम कसा होणार ? तुमच्या लोकसभा मतदारसंघात मदत कशी होणार? असा सवाल उपस्थित करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर इंदापुरात तोफ डागली. सध्या निवडणुकीसाठी अजित पवारांच्या सभा होत आहेत. त्यातून ते शरद पवारांसह सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टिका करतांना दिसत आहेत.
हेही वाचा…“जन्माने मी गवळी समाजाचा असलो तरी…”सुनील तटकरेंचं मोठं विधान
यावेळी अजित पवार म्हणाले की, मी तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, मी राज्याचा अर्थमंत्री आहे, उपमुख्यमंत्री आहे. आम्ही महायुतीत सरकार चालवत आहोत. मी राज्यासाठी अनेक गोष्टी केल्या. मी आताही सरकारमध्ये गेलो ते कामासाठीच गेलो. मी सत्तेला हपापलेला माणूस नाही. मी अनेक वर्षे अनेक पदांवर होतो. मी पाच ते सहा वेळेला उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं आहे. माझा रेकॉर्ड कोणी तोडेल असं मला वाटत नाही. सहा वेळा उपमुख्यमंत्री व्हायला तेवढ्या वेळेला निवडूनही यायला पाहिजे. अलीकडे आम्ही काम नाही केलं की लोक पार्सल बाजूला करतात. ही निवडणूक देशाचं भवितव्य घडवणारी निवडणूक आहे.”
हेही वाचा…“ज्यांना खासदाराचं काय काम असतं हे माहीत नाही, ते आम्हाला विचारतात ४० वर्षात काय केलं?”
यातच अजित पवारांनी इंदापूरच्या वकीलांच्या आणि डॉक्टरांच्या मेळाव्यात डॉक्टर महिलेचं नाव घेऊन शरद पवारांच्या त्या वक्तव्यावर मिश्किल टोलाही लगावला. उपस्थित महिला डॉक्टरांना उद्देशून अजित पवार म्हणाले की, “तुम्ही सून म्हणून आला असला तरी आम्ही तुम्हाला बाहेरच्या म्हणणार नाही, एवढं लक्षात ठेवा. तुम्ही आमच्या घरच्या आहात. आमच्या घरची लक्ष्मी आहात’, असं म्हणत शरद पवारांवर निशाणा साधला.
दरम्यान, “डॉक्टरांशी सगळे खरे बोलतात. त्यामुळे तुम्ही नक्की राजकारणात काय चाललं आहे. आपल्या रुग्णांना विचारा. आमचं नाव घेतलं तर जरा चांगले बोला. जर दुसरे नावं घेतलं तर जोरात इंजेक्शन द्या”, अशी मिश्किल टोलाही अजित पवारांनी यावेळी लगावला आहे. “वाडप्या घराचा असला की कितीही वाढता येत. आता मी वाढपी आहे. तुम्ही मला साथ द्या मी तुम्हाला साथ देईल. आतापर्यंत तुम्ही खासदाराला निवडून दिले आता महायुतीच्या खासदाराला निवडून दिलं तर त्याची कारकीर्द आजपर्यंत जे खासदार निवडून गेले आहेत त्यांच्या पेक्षा महायुतीचा हा खासदार उजवा असेल”, असा विश्वासदेखील अजित पवारांनी यावेळी व्यक्त केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…बारामतीत सुनेत्रा पवारांच्या विरोधात शरद पवारांनी अर्ज भरला ? बारामतीत मोठा ट्विस्ट
हेही वाचा..“पुढील पाच वर्षांचा रोडमॅपही तयार “, माणगावच्या सभेत तटकरे काय काय म्हणाले ?
हेही वाचा…“जन्माने मी गवळी समाजाचा असलो तरी…”सुनील तटकरेंचं मोठं विधान