परभणी : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी परभणी लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून महादेव जानकर तर महाविकास आघाडीकडून संजय जाधव यांना उमेदवारी देण्यात आलीय. यातच आता निवडणुकीच्या ऐन तोडांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप- प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यातच अजितदादा गटातील मंत्री धनंजय मुंडे आणि आमदार रत्नाकर गुट्टे यांनी संजय जाधवांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यावर जाधवांनी कडक शब्दात प्रत्युत्तर दिलंय.
महादेव जानकर यांच्यासाठी धनंजय मुंडेंनी परभणीत प्रचार सभा घेतली. यावेळी धनंजय मुंडे यांनी संजय जाधवांवर टिका करतांना वाळू खाणारा खासदार म्हटले तर रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी जमिनी हडपणारा खासदार म्हणून उल्लेख केला. त्यावर आता ज्या दिवशी मी शेण खाल्ल्याचे तुम्ही दाखवून द्याल. त्यादिवशी मी तुमच्यासमोर नतमस्तक होईल आणि आयुष्यभर तोंड दाखवणार नाही असा पलटवार संजय जाधवांनी केलाय.
यावेळी संजय जाधव म्हणाले की, विरोधकांच्या वतीने सध्या माझ्याविरोधात मोठ्या प्रमाणात आरोप केले जात आहेत. पण माझे विरोधकांना आवाहन आहे की, मी काही चुकीचं केलं असेल मी कुठे शेण खाल्ले तर माझ्या विरोधात पोलीस ठाण्यामध्ये तक्रारी करा. माझ्या विरोधात कोर्टामध्ये जा. मी त्या ठिकाणी माझे उत्तर देईन. पण माझ्या विरोधात फुकट बिन कामाचे का बोंबलत आहात ? ज्या दिवशी शेण खाल्ल्याचे तुम्ही दाखवून द्याल. त्यादिवशी मी तुमच्यासमोर नतमस्तक होईल आणि आयुष्यभर तोंड दाखवणार नाही. असा पलटवार संजय जाधवांनी घनसांगवीच्या सभेत केला.
दरम्यान, मागील २५ ते ३० वर्षांपासून राजकारणामध्ये सक्रीय आहे. मी दोन वेळेस आमदार होतो. दोन वेळेस खासदार झालो. नगरपालिकेचा सदस्य, नगरपालिकेत सभापती, कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती, शिवसेनेचा पदाधिकारी, तालुकाप्रमुख, जिल्हा अध्यक्ष अशा सर्वच आघाड्यावर काम केले. मला पांडुरंगाने भरपुर काही दिले. माझे वडील अल्पभुधारक शेतकरी, शेतामध्ये वडील काम करत होते. पण बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मला राजकारणात अनेक पदं दिलीत. असेही ते म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा….“अमोल कोल्हे राजकारणातील दुसरे संजय राऊत”, आढळरावांनी कोल्हेंना डिवचलं
हेही वाचा…बारामतीत सुनेत्रा पवारांच्या विरोधात शरद पवारांनी अर्ज भरला ? बारामतीत मोठा ट्विस्ट
हेही वाचा..“पुढील पाच वर्षांचा रोडमॅपही तयार “, माणगावच्या सभेत तटकरे काय काय म्हणाले ?