पुणे : विकास निधी पाहिजे असेल तर घड्याळाचा बटन कचाकच दाबा असे जाहीर आव्हानच अजित पवारांनी मतदारांना केले. बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारात अजित पवारांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यावरून विरोधकांनी अजितदादांसह महायुतीवर कडाडून टिका केली. त्यावर आज अजित पवार यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
हेही वाचा…Live Ajit Pawar | सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ महायुतीची पुण्यात सभा, लाईव्ह
इंदापूर येथे सभेत अजित पवारांनी ‘तुम्हाला पाहिजे तेवढा निधी आम्ही देऊ, पण आमच्यासाठी मशीनमध्ये कचाकच बटन दाबा’ असं वक्तव्य केलं. त्यावर आता अजितदादांनी स्पष्टीकरण दिलंय. यावरून पत्रकारांनी प्रश्न विचारला असता. त्यावर अजित पवार म्हणाले की, आता कुठल्या गोष्टीत ‘ध चा मा’ करु नये. मी तिथे गंमतीने म्हटलं. समोर डॉक्टर, वकील होते. ती जाहीर सभा नव्हती, मर्यादीत लोकांची सभा होती. जाहीरनाम्यात बरच काही सांगितलं जातं. मग ते प्रलोभन दाखवतायत का? निधी देत असताना, विकासकामाला रस्ते, विकासाला निधी देण्याचं आमदार, खासदाराच काम असतं. आमचा सांगण्याचा प्रयत्न हाच असतो की, मागे ज्याने काम केलं, त्यापेक्षा जास्त विकास आम्ही करु. हे साध सरळ गणित आहे. मी विचार करुनच बोलतो. आचारसंहितेत जे नियम घालून दिले आहेत, त्याचा माझ्याकडून भंग होऊ नये, याची खबरदारी घेत असतो.
त्याआधी सुनेत्रा पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज भरण्यापुर्वी सुनेत्रा पवारांसह अजितदादांनी दगडुशेठ गणपतीचं दर्शन घेतलं. त्यानंतर सुनेत्रा पवार यांच्यासाठी महायुतीची मोठी सभा पार पडली. तर महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणूका चांगल्या वातावरणात पार पडाव्यात, यासाठी गणरायाने आशिर्वाद द्यावेत. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणार, त्यासाठी महाराष्ट्रातून महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावेत, अशी प्रार्थना दगडूशेठ गणपतीच्या चरणी केल्याच” अजित पवार यांनी सांगितले.
आज उमेदवारी अर्ज भरणं म्हणजे शक्ती प्रदर्शन नाही. महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज भरताना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी उपस्थित रहायच हे ठरलय. हा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सांगली, साताऱ्याला जाणार. उद्या धाराशिवला जाणार. शक्ती प्रदर्शन वैगेरे काही नाही. अर्ज भरताना उपस्थित राहण्याच आवाहन केलय. फॉर्म भरल्यानंतर सभा होईल. त्यानंतर नेते आपआपल्या कार्यक्रमाला जातील” असेही त्यांनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा…“बारामतीला लीड मिळणार की नाही, ते बारामतीकर सांगतील”, अजितदादांनी लोकसभेसाठी ठोकला शड्डू
हेही वाचा..” ही माझी शेवटची निवडणूक आहे”, मतदारांना आढळरावांनी घातली भावनिक साद