धाराशिव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडतांना दिसत आहेत. यातच धाराशिव जिल्ह्यातील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेत तथा माजी मंत्री मुधकरराव चव्हाण यांचे पुत्र सुनील चव्हाण हे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात दाखल होणार आहे. त्यामुळे धाराशिव मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून याचा फायदा धाराशिवच्या उमेदवार अर्चना पाटील यांना होण्याची शक्यता आहे. सुनील चव्हाण यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकत आज भाजपमध्ये प्रवेश करणार असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा..” ही माझी शेवटची निवडणूक आहे”, मतदारांना आढळरावांनी घातली भावनिक साद
माजी मंत्री मधुकर चव्हाण यांचे पुत्र सुनील चव्हाण यांनी महाराष्ट्र कॉंग्रेस कमिटी सचिव पदाचा राजीनामा दिला आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत एक पत्र लिहिलं असून त्यात राजीनाम्याचा उल्लेख करण्यात आलाय. त्याआधी मागील दोनच दिवसापुर्वी मधुकरराव चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यावेळी बसवराज पाटील देखील उपस्थित होते. त्यामुळे सुनील चव्हाण भाजपमध्ये आज प्रवेश करणार आहेत.
सुनील चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. चव्हाण यांच्या प्रवेशामुळे भाजपची जिह्यात मोठी ताकद वाढणार आहे. सुनील चव्हाण यांचे वडील मधुकरराव चव्हाण राजकारणातील एक अनुभवी व्यक्तीमत्व असून मधुकर चव्हाण यांनी मात्र सध्या कोणताही निर्णय घेतलेला नाहीय.
READ ALSO :
हेही वाचा…लोकशाहीच्या महापर्वाला आजपासून सुरूवात, राज्यात पाच मतदारसंघात आज मतदान
हेही वाचा…मोहोळांच्या प्रचारात मनसे सक्रीय ; भाजपा मनसे पदाधिकाऱ्यांची प्रचार नियोजन बैठक संपन्न
हेही वाचा…“मशीनमध्ये कचाकच बटन दाबा’, विरोधकांची टिका, अजितदादांनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…
हेही वाचा…“बारामतीला लीड मिळणार की नाही, ते बारामतीकर सांगतील”, अजितदादांनी लोकसभेसाठी ठोकला शड्डू